• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

विरोधात बातमी लावली;पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकीच दिली

MH25News by MH25News
September 2, 2025
in क्राइम, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
विरोधात बातमी लावली;पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकीच दिली
0
SHARES
99
VIEWS

पत्रकार सागर गरड यांना जीवे मारण्याची धमकी : बार्शी पोलिसात गुन्हा दाखल

बार्शी बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंगळ कारभार चालू असून, बांधकाम कामगारांच्या नोंदणी बाबत व कामगारांच्या भांडी संचाबाबत खेळखंडोबा चालू असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. तसेच बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे एजंट बांधकाम कामगारांची आर्थिक पिळवणूक करून, गोरगरीब जनतेचे शोषण केल्याच्या अनेक गोष्टी पुराव्यासह उघडकीस येत आहेत. कष्ट करणाऱ्या गोरगरीब बांधकाम कामगारांकडून नोंदणीच्या नावाखाली दोन दोन हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक पिळवणूक व शोषण केले जात आहे. एजंटांच्या मोठ्या साखळीमुळे सर्वसामान्य जनतेला विनाकारण आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी, पांगरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यासंदर्भात, पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार सागर गरड यांच्यासह अन्य चार पत्रकार चारचाकी गाडीमध्ये पांगरी येथे गेले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर परत निघत असताना, पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूस अंदाजे 100 ते 125 लोकांची ( महिला व पुरुष ) गर्दी दिसल्यामुळे, त्या ठिकाणी कशाची गर्दी आहे हे पाहण्यासाठी चारचाकी गाडी उभा केली होती. सदरील ठिकाणी लॅपटॉप, कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनिंग मशीन, भांड्याचा संच इत्यादी गोष्टी दिसून आल्या. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थिततांना विचारणा केली असता, उपस्थितांनी या ठिकाणी बांधकाम कामगारांचा भांडी संच नोंदणीचा कॅम्प चालू असल्याचे सांगितले. सदरील विषयासंबंधी बांधकाम कामगार कार्यालयाचे सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त निलेश यलगुंडे यांना फोनवरून विचारणा केली असता, बांधकाम कामगारांसाठी भांडी संच नोंदणी कॅम्प बार्शीमध्ये आयोजित करण्यात आला असून, पांगरी येथे कादेशीर व अधिकृत कोणत्याही कॅम्प ची परवानगी नसल्याचे सांगितले. तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा भांडी संच साठी नोंदणी करत असताना कुणी एजंट पैशाची मागणी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निलेश यलगुंडे यांनी सागर गरड यांना फोनवरून सांगितले. या प्रकरणामध्ये भांडी संच वाटप करण्यासाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार सुरज बोरामणीकर हे सोलापूर जिल्ह्यातील व बार्शी तालुक्यातील काही एजंटांना हाताशी धरून बांधकाम कामगारांची आर्थिक पिळवणूक करत, शासनाची फसवणूक करत बेकायदेशीर काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पत्रकार सागर गरड यांनी बांधकाम कामगार मंत्री आकाश पुंडकर यांच्या स्वीय सहाय्यकाला फोनवरून सदरील गोष्ट सांगितली व मेलद्वारे बांधकाम कामगार मंत्री, बांधकाम कामगार मंडळाचे सचिव, जिल्हाधिकारी सोलापूर व बांधकाम कामगार सहाय्यक आयुक्त सोलापूर यांना दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी मेलद्वारे तक्रारी केल्या होत्या.

Follow us on social media:

या तक्रारीचा राग मनात धरून, दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी जनता न्यूज 24 चे संपादक पत्रकार सागर गरड हे आगळगाव वरून आपल्या कामानिमित्त बार्शीला येत असताना दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान भोयरे जवळील दत्त मंदिराजवळ काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या, स्प्लेंडर दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन अज्ञात युवकांनी सागर गरड यांना “तू सुरज बोरामणी व सुदर्शन गोरे यांच्याविरुद्ध कामगार मंत्री व बांधकाम कार्यालयामध्ये तक्रार का केली? तुला खूप माज आला आहे का? तुला गाडीखाली घेऊन मारून टाकीन, तुला संपवून टाकतो” अशाप्रकारे जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी पलायन केले.

सर्वसामान्य जनतेची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी व गोरगरीब कष्टकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी केलेल्या तक्रारीमुळे तक्रारदारावर जीवघेणा प्रसंग ओढावत असेल तर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी कंत्राटदार व एजंट मंडळी ही गुंडगिरी प्रवृत्तीची आहे का? यांना कायद्याचा धाक नाही का? शासन या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का? अशी चर्चा संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये होत आहे. याबाबत पत्रकार सागर गरड यांनी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे 3 अज्ञात व्यक्ती विरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक चौधरी हे करत आहेत.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!