• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

MH25News by MH25News
September 26, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
0
SHARES
166
VIEWS

महिनाभर सराव केलेल्या गणेश मंडळांना कला सादर करण्यासाठी मिळाला अधिकचा वेळ

धाराशिव – धाराशिवमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, लेझीम आणि ढोल-ताशांच्या सादरीकरणासाठी मंडळांनी मोठी तयारी केली होती. मात्र, मिरवणुकीला वेळेचं बंधन असल्याचं सांगत पोलिसांनी काही मंडळांना सादरीकरण थांबवण्याचे आदेश दिले.
ऐन मिरवणुकीत सादरीकरण थांबवण्याचे आदेश मिळाल्याने गणेश मंडळांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. कारण, या सादरीकरणासाठी अनेक मंडळांनी तब्बल एक महिन्यापासून सराव केला होता. ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर आपलं सादरीकरण करण्यासाठी मंडळांनी मोठी मेहनत घेतली होती.
ही बाब खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना फोन केला. गणेश मंडळांनी केलेली तयारी आणि पारंपरिक सादरीकरणासाठी त्यांना योग्य वेळ मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्यानंतर पोलिसांकडून गणेश मंडळांना सादरीकरणासाठी अधिकचा वेळ देण्यात आला. त्यामुळे मंडळांना आपलं नियोजित सादरीकरण पूर्ण करता आलं.

Follow us on social media:

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून ओम राजेनिंबाळकर यांचे आभार मानणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आल्या. “दरम्यान एक कॉल… प्रॉब्लेम सॉल्व्ह” अशा आशयाच्या पोस्ट शेअर करत कार्यकर्त्यांनी ओमराजेंच्या तत्पर हस्तक्षेपाचं कौतुक केलं.

एकीकडे विसर्जन मिरवणुकीत शिस्त आणि वेळेचं नियोजन महत्त्वाचं असताना, दुसरीकडे महिनाभर सराव करून तयार केलेल्या पारंपरिक कला-सादरीकरणाला वेळ मिळावा, अशी गणेश मंडळांची मागणी होती. ओमराजेंच्या फोननंतर वाढीव वेळ मिळाल्याने गणेश मंडळांमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळालं

संबंधित बातम्या

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026
उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी
अर्थव्यवस्था

उमरगा व लोहारा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आनंद पाटील यांची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!