• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, October 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी📰 प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड📰 मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी📰 मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?📰 कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

MH25News by MH25News
October 28, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
0
SHARES
14
VIEWS

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रशासनाला निवेदन; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये वाहनधारकांकडून कथित अवैध आर्थिक वसुली होत असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीने निवेदन सादर करून वाहनधारकांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी उपस्थित करण्यात आल्या आहेत. टोलनाके, महामार्ग, गर्दीची ठिकाणे तसेच प्रमुख वाहतूक मार्गांवर वाहनचालकांकडून कथितरीत्या अवैध आर्थिक वसुली होत असल्याच्या तक्रारींची सखोल तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांच्या वाहनतपासणी व दंडवसुली प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी. टोलनाके, महामार्ग आणि प्रमुख वाहतूक मार्गांवरील कथित अवैध आर्थिक वसुलीच्या तक्रारींची स्वतंत्रपणे तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाहनचालकांकडून दंडाच्या नावाखाली अधिकृत पावतीशिवाय रक्कम घेतली जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. सर्व वाहनतपासणी आणि दंडवसुली प्रक्रिया पारदर्शक ठेवून अधिकृत पावती किंवा ई-चलनाद्वारेच दंड आकारला जावा. वाहनधारकांना विनाकारण त्रास देणे, धमकावणे किंवा पैशांसाठी दबाव आणणे यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Follow us on social media:

तसेच वाहनधारकांना तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन किंवा तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि प्राप्त तक्रारींची चौकशी करून केलेल्या कारवाईचा अहवाल निवेदनकर्त्यांना लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

१५ दिवसांत चौकशी करण्याची मागणी

या प्रकरणाची निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने वाहनधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि कायद्यानुसार अधिकृत दंड भरावा; मात्र कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर आर्थिक मागणी किंवा विनाकारण होणारा त्रास सहन करावा लागू नये, ही समितीची भूमिका असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांच्या कामकाजाची पारदर्शक तपासणी करावी आणि वाहनधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी समितीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026
मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
ग्रामीण

मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी

October 27, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
ग्रामीण

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?

October 24, 2026
कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
अर्थव्यवस्था

कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी

October 22, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
कृषी

महाराष्ट्रात हरित ऊर्जा विस्तारातून भारनियमन टाळण्यास होऊ शकते मदत; हरीत उर्जा निर्मितीमध्ये धाराशिव ठरू शकतो केंद्रबिंदू

October 22, 2026
तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
क्राइम

तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

October 18, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
  • मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
  • मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
  • कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!