• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, September 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धुक्याने सामना रद्द; बीसीसीआयच्या नियोजनाचा गलथान कारभार? चाहत्यांचा रोष शिगेला

MH25News by MH25News
December 18, 2025
in क्रीडा, जागतिक, तंत्रज्ञान, संपादकीय
0
धुक्याने सामना रद्द; बीसीसीआयच्या नियोजनाचा गलथान कारभार? चाहत्यांचा रोष शिगेला
0
SHARES
38
VIEWS

भारत दक्षिण-आफ्रिका यांच्यातील लखनऊच्या मैदानावर होणारा चौथा टी-20 सामना मैदानावर धुक्याची चादर पसरल्याने अखेर रद्द करण्याची वेळ आली. मैदानावर खेळाडू उतरायच्या आधीच परिस्थिती इतकी धोकादायक झाली की सामना खेळवणं अशक्य ठरलं. हा केवळ एक सामना रद्द होण्याचा प्रकार नव्हता, तर भारतीय क्रिकेट नियोजनावर पुन्हा एकदा बोट ठेवलं गेलं.

डिसेंबर आला की उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये दाट धुके, थंड हवा आणि प्रदूषण यांचा त्रास वाढतो, हे नवं नाही. दिल्ली, लखनऊसारख्या भागांमध्ये याच काळात दृश्यमानता कमी होणं, खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होणं आणि सामन्यांच्या वेळापत्रकात गोंधळ होणं, हे वर्षानुवर्षे पाहायला मिळतं. तरीही दरवेळी आंतरराष्ट्रीय सामने याच काळात इथेच ठेवले जातात आणि नंतर अनिश्चिततेचा खेळ सुरू होतो.

या सामन्याच्या रद्दीकरणानंतर चाहते आणि क्रिकेट अभ्यासकांनी पुन्हा एकदा बीसीसीआयच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. “हवामानाचा अंदाज घेणं इतकं अवघड आहे का?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. अनेक क्रिकेटप्रेमींना असं वाटतं की हिवाळ्यातील महत्त्वाचे सामने दक्षिण भारतातील शहरांमध्ये ठेवणं हा जास्त व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद किंवा तिरुवनंतपुरमसारख्या ठिकाणी या काळात हवामान तुलनेने स्थिर असतं आणि सामने सुरळीत पार पडण्याची शक्यता अधिक असते.

https://x.com/Cric_Rishabh/status/2001308564816867514?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2001308564816867514%7Ctwgr%5E945ad09e0920582e1bb983e8cd26f72d40820475%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.in%2Findia-vs-south-africa-4th-t20-called-off-due-to-fog-fans-question-bcci-planning-winter-matches-in-north-india%2F

Follow us on social media:

सतत अशा घटना घडणं ही केवळ चाहत्यांसाठी निराशाजनक बाब नाही, तर खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चिंतेची गोष्ट आहे. मैदानावर उतरण्यापूर्वीच सामना रद्द व्हावा, ही कोणालाच नको असलेली परिस्थिती आहे. याचा फटका संघाच्या तयारीला, प्रेक्षकांच्या उत्साहाला आणि प्रसारकांच्या नियोजनालाही बसतो.

सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या प्रकाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लाजिरवाणी घटना म्हटलं आहे, तर काहींनी थेट बीसीसीआयलाच भविष्यकाळात तरी हवामानाचा गंभीरपणे विचार करण्याचं आवाहन केलं. आता खरा प्रश्न असा आहे की, या धुक्यातून धडा घेऊन पुढील वेळापत्रक अधिक शहाणपणाने आखलं जाणार का? की पुन्हा-पुन्हा स्वतःचीच पुनरावृत्ती करत राहणार?

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!