• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, October 2, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान

MH25News by MH25News
August 16, 2026
in अर्थव्यवस्था, उद्योग, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
हरित धाराशिव अभियान २.० चा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात धाराशिव जिल्हा प्रशासनाला सेरेंटिका रिन्यूएबल्सचे मोलाचे योगदान
0
SHARES
59
VIEWS


धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला कंपनीचा पाठिंबा; १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड

Follow us on social media:

धाराशिव – ‘हरित धाराशिव अभियान २.०’ अंतर्गत आयोजित भव्य वृक्षारोपण मोहिमेचा यशस्वी समारोप झाला. या उपक्रमाने “१२ तासांत सर्वाधिक मोठ्या मियावाकी वृक्षारोपण मोहिमेचा” गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करत पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक विक्रम नोंदवला.
या ऐतिहासिक उपक्रमाला सेरेंटिका रिन्यूएबल्स ने महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून अभिमानाने पाठिंबा दिला. या उल्लेखनीय प्रयत्नात योगदान देत, कंपनीने पर्यावरणीय शाश्वतता आणि समुदायाच्या सक्रिय सहभागाप्रती आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली.
धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांनी आज शिंगोली गावात आयोजित कार्यक्रमात सेरेंटिका रिन्यूएबल्स यांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक आणि मा. श्री. ओमराजे निंबाळकर, खासदार यांच्या हस्ते सेरेंटिका रिन्यूएबल्सचे एव्हीपी – एनेबलमेंट सर्व्हिसेस, श्री. टी. एम. हेमनाथन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेरेंटिका रिन्यूएबल्स यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रशंसा करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेशी सुसंगतपणे, २०४७ पर्यंत राज्यात ३ अब्ज वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यापक लोकचळवळ उभारण्याचे ध्येय राज्याने निश्चित केले आहे. या महत्त्वाकांक्षी संकल्पनेच्या अनुषंगाने ‘हरित धाराशिव अभियान २.०’ हे जिल्हा प्रशासन, स्थानिक समुदाय आणि विविध कंपन्यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
वृक्षारोपण मोहिमेला पाठिंबा देताना सुरजीत नारायण, एव्हीपी, कळंब प्रकल्प, सेरेन्टिका रिन्यूएबल्स म्हणाले, “या सामूहिक प्रयत्नांना पाठिंबा देताना सेरेन्टिकाला अभिमान वाटत आहे. या उपक्रमाने प्रतिष्ठित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. आमची बांधिलकी केवळ स्वच्छ ऊर्जा निर्मितीपुरती मर्यादित नाही; तर अधिक हरित आणि समृद्ध धाराशिवच्या निर्मितीसाठी योगदान देण्यावरही आमचा तितकाच भर आहे.”
सेरेंटिका रिन्यूएबल्स सध्या कळंब येथे 440 मेगावॅट आणि सोलापूर येथे 400 मेगावॅट पवन ऊर्जा क्षमतेचा विकास करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिंगोली गाव येथे आयोजित वृक्षारोपण मोहिमेत सेरेंटिका च्या 100 हून अधिक कर्मचाऱ्यांसह सहभागी होताना विक्रम अय्यंगार, इंडिया हेड – एनेबलमेंट सर्व्हिसेस, सेरेंटिका रिन्यूएबल्स, म्हणाले, “पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि हरित भारताच्या निर्मितीस हातभार लावणे हे सेरेंटिका रिन्यूएबल्स चे ध्येय आहे. ‘हरित धाराशिव’ अभियान या दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे. प्रदूषण कमी करणे आणि हरित क्षेत्र वाढवणे हा राष्ट्रीय संकल्प बनला पाहिजे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात मला आणि सेरेंटिका मधील 100 हून अधिक सहकाऱ्यांना योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी धाराशिव जिल्हा प्रशासनाचा मनःपूर्वक आभारी आहे.”
हा धाराशिव जिल्ह्याने हरित आणि शाश्वत भविष्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्याचे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात २४ तासांत सुमारे १५ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी लागवड केलेल्या सुमारे ८५ टक्के झाडांचे अस्तित्व कायम आहे. या वृक्षारोपणाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून दर सहा महिन्यांनी झाडांच्या जिवंततेचा आढावा घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!