• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, September 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

करोडोंचा डोलारा; सुविधांचा मात्र अभाव

MH25News by MH25News
March 12, 2026
in अर्थव्यवस्था, आरोग्य, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
करोडोंचा डोलारा; सुविधांचा मात्र अभाव
0
SHARES
36
VIEWS

कार्डिओलॉजिस्ट नसल्याने ऑपरेशन नाकारले; धाराशिव मेडिकल कॉलेजवर पुन्हा प्रश्नचिन्ह – MRI, CT-Scan अडखळत सुरू तर Cath Lab बंद असल्याची तक्रार

Follow us on social media:

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून “करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचं का?” असा संतप्त सवाल रुग्णसेवक मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे.
या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना यापूर्वी थोडासा बीपीचा त्रास असल्याने ऑपरेशनसाठी कार्डिओलॉजिस्टची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु महाविद्यालयात कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना सोलापूर येथे जाऊन ऑपरेशन करून घ्यावे, असा सल्ला देण्यात आला.
यामुळे धाराशिव मेडिकल कॉलेजमधील आरोग्यसेवेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांमध्येही “धाराशिवचे मेडिकल कॉलेज म्हणजे फक्त प्राथमिक उपचार आणि मलमपट्टीपुरतेच मर्यादित आहे” अशी नाराजी व्यक्त होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. विविध आजारांनी त्रस्त रुग्णांना येथे प्राथमिक उपचार करून सोलापूरला पाठवण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे अर्थकारण आधीच कोलमडलेले असताना उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हा एकमेव आधार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र येथेच जर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील, तर करोडो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचा आणि डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या पगाराचा उपयोग नेमका कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय मशीन, सीटी-स्कॅन मशीन अनेकदा बंद असतात, अशी तक्रारही त्यांनी केली. तसेच ऑर्थोपेडिक विभागातील अनेक रुग्णांना विविध कारणे सांगून खाजगी रुग्णालयात पाठवले जात असल्याचे रुग्णांकडून ऐकायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे खाजगी रुग्णालयांशी काही लागेबांधे आहेत का? असा संशयही नागरिकांच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनीही धाराशिव मेडिकल कॉलेजमधील एमआरआय मशीन आणि कॅथलॅब बंद का आहेत? असा प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले होते.
जिल्ह्यातील अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूरला हलवताना अर्ध्या वाटेतच प्राण गमावल्याची शेकडो उदाहरणे असल्याचेही जाधव यांनी सांगितले. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रुग्णसेवक तथा शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना योग्य व तातडीची आरोग्यसेवा मिळावी, अशी मागणी केली.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!