• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

राज्य दिवाळखोरीत अन् सरकारच्या फक्त पोकळ घोषणा – आ. कैलास पाटील

MH25News by MH25News
February 27, 2024
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
NDRF व SDRF च्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मदतीची आ.कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – राज्य सरकार सध्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत असुन एकाच वर्षात तीनवेळा पुरवणी मागण्या मांडल्यात यावरुन सरकार दिवाळखोरीत गेल्याच स्पष्ट दिसत आहे. असे असताना सरकार फक्त पोकळ घोषणाच करणार हे देखील उघड असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. अंतरीम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभा केले आहे. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असतानाही उसणं आवसन दाखवत पुरवणी मागण्याचा रतीब या सरकारने लावला आहे. पहिल्यांदा ७५ हजार कोटी, दुसर्‍यांदा ४० हजार कोटी व आता पुन्हा आठ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. परिस्थिती नसतानाही कर्ज काढुन सणं साजरे करण्यासारखा हा प्रकार आहे. ना आर्थिक शिस्त ना नियोजन असा निव्वळ पोरखेळ या सरकारमध्ये दिसत आहेत. या वर्षीचा आर्थिक ताळेबंदच सरकारच अपयश दाखवुन देत आहे. 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा चार लाख 98 हजार 758 कोटी रुपये व महसुली खर्च पाच लाख आठ हजार 492 कोटी रुपयावर गेला आहे. महसुली तूट नऊ हजार 734 कोटी रुपये आहे तर राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपये दिसत आहे. यावरुनच सरकारचा खरा चेहरा समोर येत आहे. अर्थसंकल्पातही नुसत्या पोकळ घोषणाशिवाय काहीच नाही. शेतकरी,तरुण, सुशिक्षित बेरोजगार, महिला , जेष्ट नागरीक या घटकाना कोणताही दिलासा मिळालेला नाही. साैर उर्जेबाबत अनेक योजना मांडल्या असल्यातरी पुर्वीच्याच योजनेची अंमलबजावणी करताना शासन अत्यंत दुर्लक्ष करत आहे. त्यात आता नव्या योजनेतुन तरी काय साध्य होणार असा प्रश्न उपस्थित होतो. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, दुष्काळाची दाहकता वाढत आहे तरीही फक्त दुष्काळ जाहीर झाला. पण एकाही रुपयाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेला नाही. ना सततच्या पावसाची मदत मिळाली ना विम्याची रक्कम यावरुनच हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे हे दिसुन येत. एकंदरीतच निवडणुक समोर ठेऊन केलेल्या पोकळ घोषणेचा परिपाक म्हणजे हा अर्थसंकल्प आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!