• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

कसबे तडवळेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक होण्यासाठी शाळेच्या बांधकामासाठी निधी द्यावा – आ.कैलास पाटील यांची मागणी

MH25News by MH25News
February 22, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
कसबे तडवळेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक होण्यासाठी शाळेच्या बांधकामासाठी निधी द्यावा – आ.कैलास पाटील यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS


धाराशिव – जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पूर्ण होण्याकरिता जिल्हा परिषद शाळा स्थलांतरित करावी व त्याच्या उभारणीकरिता निधी द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन केली आहे. २०१५ पासुनचे संदर्भ या पत्राद्वारे सरकारला दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळा (ता. धाराशिव) येथे 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी महार मांग वतनदार परिषद घेतली होती. त्याकरिता त्यांनी कसबे तडवळा येथे मुक्काम केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ वी जयंती वर्षे (दिनांक-१४ एप्रिल २०१५ ते दिनांक- १४ एप्रिल २०१६ हे समता व सामाजिक न्याय वर्षे म्हणुन साजरे केले. त्यानुसार राज्यातील एकुण २८ ऐतिहासिक व सांस्कृतीक स्थळे/ ठिकाणे निवड केली होती. त्यामध्ये कसबे तडवळे धाराशिव येथील सार्वजनिक वाचनालय, क्रांतीस्तंभ व इतर कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Follow us on social media:

या प्रकल्पासाठी आयुक्तालयाकडुन निधी वितरण करण्यात आला आहे. कसबे तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय व क्रांतीस्तंभ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या जागेवर
बांधण्याकरिता पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने स्मारकाचे काम रखडलेले आहे. १२ ऑक्टबर२०२२ रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तथा जिल्हा प्रशासनातील इतर
अधिकारी, गावकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत मौजे कसबे तडवळे येथे बैठक झाली. बैठकीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अन्य ठिकाणी बांधुन दिल्याशिवाय स्मारकाचे काम होणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी कळविलेआहे. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील गट नंबर २२९ मधील सहा हजार चौ.मी. जागेवर बांधण्यासाठी दहा कोटी शहाऐंशी लाख रुपये इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक व आराखडे सादर केले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती, धाराशिव च्या कार्यकारी मंडळाने २५ जुलै २०१९ रोजी ठराव केला. ही जागा शासकीय जमीन धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीस भुसंपादनाच्या नुकसान भरपाईसह मावेजा घेऊन पणन संचालक यांच्या पुर्वपरवानगीने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.या जागेचे मुल्यांकन उप विभागीय अधिकारी, धाराशिव यांनी थेट वाटाघाटीने/थेट खरेदी भुसंपादन करण्याच्या नियमानुसार एक कोटी ९७ लाख रुपये मोबदला निश्चित केला. सामाजिक न्याय विभागाकडुन उपलब्ध होण्याच्या अधिन राहुन जागेचे आगाऊ ताबा देण्यासाठी प्रशासक कृषि उत्पन्न बाजार समिती धाराशिव यांना आदेश देणेबाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांनी दि.३१ ऑक्टोबर २०२२ रोजी संचालक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, पुणे यांना कळविले आहे. याबाबत सहकारी, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव यांना आदेशित करुन शाळेची इमारत बांधकामा साठी १२ कोटी ८३ लाख रुपये इतकी रक्कम वितरीत करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सचिवांकडे केली आहे.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!