• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, May 16, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे उपोषण

MH25News by MH25News
December 9, 2023
in आरोग्य, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
कळंब-वाशी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने फराळ बैठकीचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

राज्यभरातील शेकडो पत्रकार होणार सहभागी
नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार

Follow us on social media:

नागपूर – पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० घरांची निर्मिती करण्यात यावी, दहा वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, अशा १४ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या वतीने येत्या १३ डिसेंबरपासून नागपूर येथील विधान भवनासमोर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. या लाक्षणिक उपोषणात व्हॉईस ऑफ मिडियाचे राज्यातील शेकडो पत्रकार सहभागी होणार आहेत. १८ आणि १९ नोव्हेंबर बारामती येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे राज्य शिखर अधिवेशन पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडले. सामाजिक बांधिलकी जोपासून विविध प्रसार माध्यमांत पत्रकारीता करणारे पत्रकार अलीकडे अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे समस्याग्रस्त पत्रकारांना शासनाकडून न्याय मिळावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या १४ विषयांवर चर्चा होऊन आवाजी मताने ठराव पारित करण्यात आला. या ठरावाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ डिसेंबरपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन काळात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या १३ डिसेंबरपासून विधान भवनासमोर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या पत्रकार हल्लाविरोधी समितीचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ वर्धाचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्यासह अनेक पत्रकार पदाधिकारी लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करणार असून दररोज राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्य कार्यकारिणीचे प्रमुख आनंद आंबेकर, शिवाजी कुहीकर, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक हे या उपोषणाच्या लढ्याची तयारी करीत आहेत. लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या हितासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभरातील पदाधिकारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पत्रकारांच्या हितासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सरदारांनी अनेक वेळा उपोषणाचे हत्यार उपसले होते, ज्याला नेहमीच यश आले. या मागण्या शासनाने गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी राज्यातील सर्व पत्रकारांतून होत आहे. यानिमित्ताने हिवाळी अधिवेशनात पत्रकार एकतेचे चित्र शासन आणि समाजासमोर दिसणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला
अर्थव्यवस्था

आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला

May 15, 2026
मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला
  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!