• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

MH25News by MH25News
August 1, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
0
SHARES
759
VIEWS

धाराशिव भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा चर्चेत

धाराशिव – धाराशिव-लातूर-बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले भाजप आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमुळे धाराशिवमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणाला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकट गुंड पाटील यांच्या पुढाकारातून 2 ऑगस्ट रोजी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रण पत्रिकेत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
धाराशिवमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह आणखी तीव्र होत असल्याचे चित्र या निमंत्रण पत्रिकेतून दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. यापूर्वीही मागील आठवड्यात राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल काळे यांना भेटू न दिल्याचा आरोप झाला होता. त्या घटनेनंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, धाराशिवच्या राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा रंगली होती.

Follow us on social media:

आता बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या पत्रिकेतून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांची नावे वगळण्यात आल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. कालच भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी फेसबुक वर पोस्ट करत “मतभेद असू शकतात पण ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडावेत. प्रसारमाध्यमातून किंवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे संघटनेची शिस्त पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणि सक्षम नेतृत्व घडते.” अशी भूमिका घेतली होती.

मात्र, आता सत्कार समारंभाच्या कार्यक्रमातून संबंधित नावे पत्रिकेत का समाविष्ट करण्यात आली नाहीत, याबाबत आयोजकांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या घडामोडीमागे नेमके कारण काय, याकडे आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!