• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, June 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तुळजापूर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; अणदूरमधील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

MH25News by MH25News
October 1, 2025
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
तुळजापूर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; अणदूरमधील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
0
SHARES
27
VIEWS

तुळजापूर – तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक चिंतेत होते. या नैराश्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.

ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नळदुर्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Follow us on social media:

उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मुला-बाळांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!