• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, May 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

MH25News by MH25News
June 13, 2025
in क्राइम, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
0
SHARES
523
VIEWS

न्याय द्या न्याय द्या मारुतीला न्याय द्या

फरार मुख्य आरोपीसह सर्व आरोपींना फाशी द्यावी

संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

Follow us on social media:

धाराशिव – धाराशिव शहरातील शाळकरी बहिणीची छेड काढणाऱ्या नराधम टोळक्यांना जाब विचारणाऱ्या भावाचा आरोपींनी संगणमताने ठेचून निर्घृणपणे खून केली. ही अत्यंत गंभीर घटना असताना देखील पोलिसांनी तपासात अक्षम्य दिरंगाई करीत मुख्य आरोपीसह सर्व आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही. त्यामुळे त्या सर्व आरोपींना अटक करून फसावर लटकावावे. तसेच धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी, या गंभीर बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर वडार एकता परिषदेच्यावतीने दि.१३ जून रोजी टाहो फोडीत आक्रोश करीत धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर यांनी केले.

धाराशिव शहरातील वडार समाजातील विद्यार्थिनी दि.८ मे रोजी रस्त्याने जात असताना धाराशिव शहरातील टवाळखोर गुंडांनी तिची छेडछाड काढली. त्यामुळे तिचा भाऊ मारुती शिवाजी इटलकर याने संबंधितांना जाब विचारला. त्याचा राग मनात धरून रणजीत चौधरी याच्या सांगण्यावरून सागर चौधरी, प्रवीण चौधरी, किशोर चौधरी, अंकुश चौधरी व सिद्धनाथ सावंत यांनी संगणमत करून मारुती इटलकर यास अमानुष बेदम मारहाण केली. त्यांनी केलेल्या मारहाणीत मारुती जबर जखमी झाला. त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी वरील आरोपी विरोधात तक्रार दिली असताना देखील धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी संबंधित सर्व आरोपींना अटक केलेली नाही. त्यांनी मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अभय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे इटलकर कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्या कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन सरकारने करावे. त्या कुटुंबातील मुलीच्या पुढील शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्या कुटुंबाला २५ लाख रुपये तातडीची आर्थिक मदत करावी. त्या कुटुंबाला रहायला हक्काचे सरकारी घर देण्यात यावे. तसेच धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर नाका येथून निघून खॉंव्जा नगर, देशपांडे स्टॅन्ड, ताजमहल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, जिल्हा न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास धडकला.

यावेळी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या स्टेजवरून मान्यवरांनी मोर्चेकर्‍यांना संबोधित करीत इटलकर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी लावून धरली. मोर्चा दरम्यान मारुती इटलकर यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे…. बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे…. न्याय न्याय द्या मारुतीला न्याय द्या…. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा धिक्कार असो…. सर्व आरोपींना फाशीवर लटकवलेच पाहिजे…. जो वडार समाज की बात करेगा, वो देश पे राज करेगा…. धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे…. आदींसह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या मोर्चामध्ये पिडित इटलकर कुटुंबिय यांच्यासह वडार एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष भरत विटकर, प्रदेशाध्यक्ष शिवाजी ननावरे, प्रदेश संपर्कप्रमुख माणिक विटकर, जिल्हा समन्वयक बालाजी शिंगे, मी महाराष्ट्राचा वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, विकास पवार, राहुल जाधव, अंकुश दुर्लेकर, नितीन चौगुले, धनंजय जाधव, मुक्ताबाई घोडके, गंगुबाई पवार, उषा गुंजाळ, पारूबाई मंजुळे, चंदाबाई देवकर, लक्ष्मी चौगुले, सुनिता चौगुले, सुनंदा चौगुले, लक्ष्मी मंजुळे, मनीषा कुऱ्हाडे, राजेंद्र कुऱ्हाडे, मुकेश चौगुले, संजय देवकर, नागू लंगडे, फुलचंद जाधव, लहू जाधव, अशोक कुऱ्हाडे, दुर्गाप्पा पवार, अंकुश दुर्लेकर, रघु पवार, बाळू गुंजाळ, विकास मंजुळे, दत्ता जाधव, दीपक दुर्लेकर, अंकुश चौगुले, अभिषेक देवकर, महादेव इटलकर, नामदेव घोडके, सुरज जाधव, अनिल चौगुले आदीसह वडार समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!