• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, June 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही अश्या कैलास पाटील यांना आशीर्वाद द्या – उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

MH25News by MH25News
November 12, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक
0
धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही अश्या कैलास पाटील यांना आशीर्वाद द्या – उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन
0
SHARES
157
VIEWS

धाराशिव – जो व्यक्ती सोन्याच्या लंकेपर्यंत गेलेला असताना, त्यावर लाथ मारत आपली निष्ठा विकली नाही, ज्यान आपल्या धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लावला नाही त्या कैलास पाटील यांना खंबीर साथ द्या असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की धाराशिवच्या जनतेने लोकसभेला आशीर्वाद दिला. जशी साथ तुम्ही ओमराजेना दिली तीच साथ कैलास पाटील यांना द्यावी. या लोकसभा मतदार संघात असलेल्या सहाही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. परंडा मतदार संघात ही गद्दारी झाली आहे त्यांना यावेळी हिसका दाखवून द्या असेही आवाहन त्यांनी जनतेला केले.
लोकसभेला आपल्या पक्षाला सात आठ जागा कमी मिळाल्या व देशात सुद्धा अजून वीस पंचवीस ठिकाणी आपले खासदार झाले असते तर मोदी आता हिमालयात गेले असते असा चिमटा त्यांनी काढला. मला हिंदुत्व सोडल म्हणणाऱ्या भाजपने नवाब मलिक आणि अनेक ठिकाणी काय केले यांचाही जाब ठाकरे यांनी भाजपला विचारला.
आमचं सरकार आल्यावर आम्ही जे करणार त्याचा वचन नामा दिला आहे पण महायुती कडून जुमला नामा दिलेला आहे, अडीच वर्ष सत्तेत असताना तुम्हाला या सगळ्या घोषणा प्रत्यक्षात आणता आल्या असत्या पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त थापेबाजी करणारी ही मंडळी आहे, आमचं सरकार स्थापन होताच त्यावेळी कशाचाही विचार न करता एका क्षणात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन शब्द मी पाळला होता. मी शब्द पाळणारा आहे व आताही ज्या गोष्टी देणार असं सांगितलंय ते देऊनच दाखवणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Follow us on social media:

कचऱ्यापेक्षाही कमी किंमत या सरकारने सोयाबीनची केली आहे हे सरकारच कचरा असून त्यांनाच फेकून द्या, आम्ही तुम्हाला हमीभाव पण देऊ व जीवनावश्यक पाच वस्तूचे दर देखील स्थिर ठेवू असे वचन ठाकरे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना हमीभाव देऊन दाखवला आहे त्यामुळं आताही ते देण्यासाठी सरकार हातात द्या असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकारी कर्मचारी यांची जुनी पेन्शन लागू करु तर आशा व अंगणवाडी सेविकाना वाढीव मानधन देऊ असेही आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ओमराजे म्हणाले ज्या व्यक्तीन आमदार झाल्यावर निष्ठा जपली संकट काळात पक्षाशी इमान राखल त्या माणसाला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा. मला या मतदार संघात 61 हजार मताधीक्य दिलंय त्यापेक्षा जास्त मतांनी कैलास पाटील यांना आमदार करावे असे आवाहन ओमराजे यांनी केले.
आमदार कैलास पाटील म्हणाले, ज्या पक्षामूळ व जनतेमूळ मला आमदार होता आलं याची जाणीव माझ्या मनात कायम राहणार आहे. कितीही संकटाचा काळ असू द्या मी पक्षाशी व जनतेशी प्रामाणिक राहीन असा शब्द त्यानी यावेळी दिला. आपण आणलेल्या शहरातील रस्ते तसेच कोट्यावधीचा निधी या सरकारने स्थगिती दिल्यानं खर्च होऊ शकला नाही. या अश्या लोकांनी विकासावर मत मागावे का असा सवाल यावेळी आमदार कैलास पाटील यांनी विरोधकाना केला.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!