• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, May 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

उजनीच्या पाण्याने तुळजाभवानी मंदिराच्या पायऱ्यांची केली स्वच्छता

MH25News by MH25News
September 6, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
उजनीच्या पाण्याने तुळजाभवानी मंदिराच्या पायऱ्यांची केली स्वच्छता
0
SHARES
55
VIEWS

उजनी धरणाच्या पाण्यासाठी अण्णासाहेब दराडे यांची अनोखी मोहीम

धाराशिव – दुष्काळी धाराशिव जिल्ह्यात वर्षानुवर्षे आस लागून राहिलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उजनी धरणाचे पाणी अद्याप मिळालेले नाही. याअनुषंगाने अण्णासाहेब दराडे यांनी गुरुवारी (दि.५) श्री तुळजाभवानी मंदिरात उजनी धरणातील पाणी टॅकरने आणून स्वच्छता करून अनोखे आंदोलन केले.

धाराशिव जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. सततच्या दुष्काळामुळे आणि नापिकीमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत धाराशिव जिल्हा कायम तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास शेतीला चांगले दिवस येतील अशा आशेवर येथील शेतकरी जगत आहेत. परंतु, गेल्या तीन दशकापासून कृष्णा खोऱ्यातील पाणी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अण्णासाहेब दराडे यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरातील पायऱ्यांची उजनी धरणातील पाणी टॅकरने आणून स्वच्छता केली. तसेच, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मारुती मंदिरामध्ये उजनी धरणातील पाण्याने अभिषेकपूजा करणार असल्याचे यावेळी अण्णासाहेब दराडे यांनी सांगितले.

Follow us on social media:

दरम्यान, तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात अण्णासाहेब दराडे यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ मुक्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून श्री.दराडे यांनी गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नावर तसेच शासकीय कार्यालयांमध्ये होणारी सर्वसामान्यांची पिळवणूक रोखण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

यावेळी संभाजी भोसले, प्रा.राम घुगे, महेश पाटील, अभिमान दराडे, अंबादास घुगे, नितीन लोभे, जोतीराम मोजगे, गणेश घुगे, केशव शिवले यांच्यासह नागरिक, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026
जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!