• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

देशातली जनता योग्य वेळी मोदी सरकारला धडा शिकवेल – शरद पवार

MH25News by MH25News
December 22, 2023
in अर्थव्यवस्था, देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण
0
देशातली जनता योग्य वेळी मोदी सरकारला धडा शिकवेल – शरद पवार
0
SHARES
2
VIEWS

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिलीरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करण्याची मागणी लावून धरली. या खासदारांनी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली दोन्ही सभागृहांमध्ये मिळून आत्तापर्यंत विरोधी पक्षांच्या १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आज विरोधी पक्षांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली.

लोकसभेत ज्या तरुणांनी घुसखोरी केली, ते लोकसभेत कसे काय पोहचले? कुणाच्या पासवर आले? यावर सरकारकडून निवेदन होण्याची आवश्यकता होती. सभागृहाचा तो अधिकार आहे. आम्ही तसे निवेदन मागितले. पण ते देण्याची सरकारची तयारी नव्हती. आम्ही आग्रह केला, तर त्याचा परिणाम निलंबनात झाला. आजपर्यंत हा प्रकार सदनात घडला नाही. विधानसभा किंवा संसदेत कार्यरत होऊन मला ५६ वर्षं झाली. मी असा प्रकार कधीच बघितलेला नाही. विरोधकांच्याही काही जबाबदाऱ्या असतात. विरोधकांकडे दुर्लक्ष करून सरकार आपल्याच पद्धतीने कारभार करू पाहात आहे. पण देशाची जनता हे सर्व बागेत आहे. याची जबरदस्त किंमत योग्य वेळी देशाची जनता वसूल करेल याचा मला विश्वास आहे, असे सूचक विधान शरद पवारांनी यावेळी केले.

विधेयकांवर चर्चा होणे हेच त्यांना आवडत नाही. कोणतंही विधेयक किंवा कायदा सभागृहासमोर येतो आणि विरोधकांना तुम्ही भूमिका मांडण्याची संधीच न देता ते पारित करणार असाल तर ते योग्य नाही. संसदीय लोकशाहीचा हा अपमान आहे. जे काही झाले, ते संसदेच्या इतिहासात आजपर्यंत घडलं नाही. ते काम या सरकारनं केलं आहे. मला विश्वास आहे की देशातली जनता योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल. १५० खासदारांना निलंबित केले. ही काय चांगली गोष्ट आहे का? संवाद ठेवायला हवा. लोकशाहीत संवादाशिवाय सरकार चालत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

Follow us on social media:

दरम्यान, निलंबनानंतर काही खासदार संसदेच्या आवारात आंदोलन करत असताना तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. त्यावरून सध्या सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून खुद्द धनखड यांनी “हा जाट समाजाचा अवमान आहे, असे म्हणत यावर नाराजी व्यक्त केली. यावरून शरद पवारांनी तीव्र नापसंती दर्शवली. ते (नक्कल करणारे सदस्य) सभागृहात होते का? सभागृहाच्या बाहेर ते घडले. समजा मी इथे आत्ता काहीतरी केले, तर त्याची जबाबदारी माझ्या पक्षावर किंवा नेत्यावर असेल का? सभागृहाबाहेर कुणी काही केले तर त्यावर फारतर चर्चा होऊ शकते. पण हे प्रकरण इथपर्यंत घेऊन जाणे अयोग्य आहे. माझ्याविरोधात काही घडले तर त्यावर ‘मी मराठा आहे, शेतकरी आहे. हा मराठ्यांचा, शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे मी म्हणणे चुकीचे आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी उपराष्ट्रपतींच्या विधानावर नापसंती व्यक्त केली.

अधिक अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!