• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, June 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे उपोषण

MH25News by MH25News
December 9, 2023
in आरोग्य, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
कळंब-वाशी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने फराळ बैठकीचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

राज्यभरातील शेकडो पत्रकार होणार सहभागी
नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार

Follow us on social media:

नागपूर – पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० घरांची निर्मिती करण्यात यावी, दहा वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, अशा १४ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या वतीने येत्या १३ डिसेंबरपासून नागपूर येथील विधान भवनासमोर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. या लाक्षणिक उपोषणात व्हॉईस ऑफ मिडियाचे राज्यातील शेकडो पत्रकार सहभागी होणार आहेत. १८ आणि १९ नोव्हेंबर बारामती येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे राज्य शिखर अधिवेशन पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडले. सामाजिक बांधिलकी जोपासून विविध प्रसार माध्यमांत पत्रकारीता करणारे पत्रकार अलीकडे अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे समस्याग्रस्त पत्रकारांना शासनाकडून न्याय मिळावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या १४ विषयांवर चर्चा होऊन आवाजी मताने ठराव पारित करण्यात आला. या ठरावाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ डिसेंबरपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन काळात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या १३ डिसेंबरपासून विधान भवनासमोर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या पत्रकार हल्लाविरोधी समितीचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ वर्धाचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्यासह अनेक पत्रकार पदाधिकारी लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करणार असून दररोज राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्य कार्यकारिणीचे प्रमुख आनंद आंबेकर, शिवाजी कुहीकर, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक हे या उपोषणाच्या लढ्याची तयारी करीत आहेत. लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या हितासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभरातील पदाधिकारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पत्रकारांच्या हितासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सरदारांनी अनेक वेळा उपोषणाचे हत्यार उपसले होते, ज्याला नेहमीच यश आले. या मागण्या शासनाने गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी राज्यातील सर्व पत्रकारांतून होत आहे. यानिमित्ताने हिवाळी अधिवेशनात पत्रकार एकतेचे चित्र शासन आणि समाजासमोर दिसणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!