• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, October 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर📰 १८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?📰 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद📰 दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर

MH25News by MH25News
October 11, 2026
in तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
0
SHARES
56
VIEWS

धाराशिव – छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावणारे रविराज साबळे यांनी प्रचाराला सुरुवात करत मतदारांच्या भेटीगाठींवर जोर दिला आहे. पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यावर साबळे यांचा भर आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध मुद्द्यांवर भूमिका मांडत आणि आपल्या कामाची माहिती देत तरुणांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापरही महत्त्वाचा ठरत आहे.

Follow us on social media:

यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केल्यानंतर आता पदवीधरांच्या प्रश्नांकडेही लक्ष देणार असल्याची भूमिका रविराज साबळे यांनी घेतली आहे. बेरोजगारी, तरुणांच्या रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि पदवीधरांच्या विविध समस्या हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरू शकतात.

दरम्यान, या निवडणुकीत साबळे यांच्यासमोर गेली १८ वर्षे पदवीधर मतदारसंघाचे आमदार राहिलेले सतीश चव्हाण यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे प्रथमच निवडणूक लढवणारे रविराज साबळे आणि दीर्घकाळ आमदार म्हणून काम केलेले सतीश चव्हाण यांच्यातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांशी साधला जाणारा संवाद, याच्या जोरावर रविराज साबळे पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या निवडणुकीत पदवीधरांचे प्रश्न, उमेदवारांची भूमिका आणि मतदारांचा प्रतिसाद यांना किती महत्त्व मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
ग्रामीण

१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?

October 10, 2026
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
ग्रामीण

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

October 7, 2026
दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
अर्थव्यवस्था

दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या

October 2, 2026
दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
  • १८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
  • औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
  • दिवाळी विशेष रेल्वेला ढोकी, कळंब रोडला थांबा द्या
  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!