• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

चोराच्या उलट्या बोंबा; स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर?

MH25News by MH25News
October 29, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शैक्षणिक, संपादकीय
0
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय;शिवसेना प्रवक्ते जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
0
SHARES
168
VIEWS

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपला डिवचलं

धाराशिव – धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या रस्ते कामांना कार्यारंभ आदेश आल्यानंतर फडणवीस सरकारने त्यास स्थगिती दिली असून याचा दोष मात्र आमच्यावर? म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आता जिल्ह्यात सुरु झाला आहे. निधी जाहीर झाला की त्याचं श्रेय यांनीच घ्यायचं पण मनासारखं नाही झालं की आमच्यावर ढकलायचं असा रडका प्रकार राणा पाटील हे करत आहेत असा टोला शिवसेना ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

यावेळी जाधवर म्हणाले की, विरोधात असलेल्या आमदार, खासदार यांना या राज्यात सत्ताधारी कशी वागणूक देतात हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. शहरात 140 कोटींचा निधी मंजूर झाला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत व भाजप आमदार राणा पाटील यांच्यातच श्रेयवाद होता. फेब्रुवारी 2024 पासून कामाची निविदा काढण्यासाठी साधारण 20 महिने लागले. हे राबविताना अनियमितता झाल्याचे त्यांच्याच मित्रपक्षाकडून बोलल जात आहे. जिल्ह्यात हक्काच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाना स्थगिती आणली म्हणून ढोल वाजविणारे भाजप आमदार राणा पाटील आता एका कामास त्यांच्याच मित्र पक्षाकडून रस्ते कामास स्थगिती आणल्यावर मात्र विरोधकांना दोष देत आहेत. हे निव्वळ हास्यास्पद आहे. अहो, ‘दुकान तुमचं दुकानदारी तुमची आणि तोटा झाला आमच्यामुळं’ हे कोणाला तरी पटेल का?
जुलै 2022 ला महाविकास आघाडीचे सरकार पडून महायुतीचे सरकार आले. तेव्हा याच सत्ताधारी मंडळींनी मागील आघाडी सरकारने मंजूर केलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. न्यायालयीन निर्णय होऊनही ही स्थगिती उठवली नाही. मग सरकार मध्ये आमच्या मताला एवढं महत्व असते तर ही कामे रद्द झाली असती का? यात शहरातील रस्ते, तीन बगीचा, आठवडी बाजार या कामाचा समावेश होता. नव्या सरकारने तीच कामे पुन्हा मंजूर केली पण त्यातील एकही काम अजून हाती घेण्यात आलं नाही. उघडपणे स्थगिती देणारे तुम्ही असतानाही आम्ही परिस्थितीला सामोरे गेलो. न्यायालयीन लढा दिला याउलट आता यांचेच मुख्यमंत्री सांगेल तेव्हा कोणत्याही कामाला अजूनही स्थगिती देतात उदाहरण डीपीसी निधी. मग रस्त्याच्या कामाना तुमच्याच सरकारने स्थगिती दिल्यावर हे जर विरोधकावर बोट दाखवणार असतील तर यापेक्षा मोठा विनोद कोणता? असा सवाल तानाजी जाधवर यांनी सत्ताधारी आमदारांना केला आहे.

Follow us on social media:

दुसऱ्यांना अपप्रवृत्ती म्हणनाऱ्याची स्व:प्रवृत्ती काय आहे? एक गुत्तेदार अपात्र असतानाही त्याला पुन्हा पात्र करून घेण्यासाठी वीस महिने तुम्ही केलेली धडपड तुमची प्रवृत्ती दाखवून देते. पण काळ हेच त्याचं उत्तर असतं. माझ्याच मनासारखं झालं तर ठीक नाहीतर काहीच होऊ द्यायचे नाही या तुमच्या मनोवृत्तीमुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे. आपले दोष बाजूला ठेवून दुसऱ्यांना दोषी ठरवणे हा निव्वळ बालिशपणा असल्याचं मत प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी व्यक्त केले आहे

रस्त्याची कामे लवकर व्हावी हीच प्रामाणिक भावना असून
आम्ही एसआयटीची मागणी केलीच आहे. त्यात दोष कोणाचा हे समोर येईल पण तुमच्या अर्थकारणामुळे शहरवासीयांचे वीस महिन्यांपासून जे हाल होत आहेत हे थांबावेत. ही रस्त्याची कामे लवकर सुरु व्हावीत हीच आमची प्रामाणिक भावना असल्याचं जाधवर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!