• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, May 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा📰 बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश📰 परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा📰 चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी📰 तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा - आ.कैलास पाटील
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

MH25News by MH25News
May 28, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
0
SHARES
36
VIEWS

धाराशिव – मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयओआर) कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी नळदुर्ग येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगरचे शिक्षक पी. डी. टेकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. तसेच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध पोलीस गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियान सुरू आहे. २४२१ तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील ३५२ नळदुर्ग मतदान केंद्रासाठी पी. डी. टेकाळे यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी पुनरिक्षणाचे कामकाज न केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

तुळजापूर तहसील कार्यालयाकडून टेकाळे यांना प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच १८ फेब्रुवारी व ३० फेब्रुवारी २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

Follow us on social media:

सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी ४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून कडक कारवाईची शिफारस केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना टेकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच तुळजापूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकाविरुद्ध तातडीने पोलीस गुन्हा दाखल करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाच्या पालनात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षणाचे काम सुरू असताना काही बीएलओंकडून कामात दिरंगाई होत असल्याने मॅपिंगची टक्केवारी कमी झाल्याची चर्चा आहे. टेकाळे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित बातम्या

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026
चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राइम

चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

May 24, 2026
तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा – आ.कैलास पाटील
अर्थव्यवस्था

तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा – आ.कैलास पाटील

May 21, 2026
ट्रॅक्टरला रस्ता देण्याच्या कारणावरून खामकरवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; २५ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्राइम

ट्रॅक्टरला रस्ता देण्याच्या कारणावरून खामकरवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; २५ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

May 21, 2026
काँग्रेस च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड
ग्रामीण

काँग्रेस च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

May 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
  • परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
  • चालत्या ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
  • तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा – आ.कैलास पाटील
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!