• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

MH25News by MH25News
March 20, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
0
SHARES
27
VIEWS

धाराशिवकडून मिळणारी सर्वांत मोठी शिकवण ही आहे की पायाभूत सुविधा प्रकल्प हे केवळ समुदायांसाठी नव्हेत तर समुदायांच्या सहभागाने उभे केले तरच ते यशस्वी होतात.

महाराष्ट्राची वीजेची गरज झपाट्याने वाढत आहे. वाढती शहरे, उद्योग आणि पायाभूत सुविधा यांमुळे राज्याला सध्या साधारणपणे 29 गिगावॅट वीज लागते आणि ही मागणी 2030 पर्यंत जवळपास 45 गिगावॅटपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे हे धोरणकर्त्यांसमोर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांसमोरील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे.
याठिकाणी नवीकरणीय (रिन्यूएबल) ऊर्जा, खासकरून पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मराठवाड्यातील दुष्काळप्रवण धाराशिव जिल्ह्यात शांतपणे एक महत्त्वाचा बदल घडत आहे. एकेकाळी मुख्यत्वे पाणीटंचाई आणि मर्यादित आर्थिक संधींसाठी ओळखला जाणारा हा जिल्हा आता हरित ऊर्जेचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.
या बदलात योगदान देणाऱ्या अनेक कंपन्यांपैकी सेरेंटिका रिन्यूएबल्सही एक आहे. त्यांच्या पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची ऊर्जा सुरक्षितता मजबूत होत असून स्थानिक विकासालाही चालना मिळत आहे.
दुष्काळप्रवण जिल्ह्याकडून हरित ऊर्जा केंद्राकडे मार्गक्रमणा
अनेक वर्षांपासून धाराशिवला अनियमित पाऊस आणि मर्यादित औद्योगिक विकासाचा सामना करावा लागला आहे. येथील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असून त्यामुळे लोकांचे उपजीविकेचे साधन मोठ्या प्रमाणावर मान्सूनवरच टिकून आहे. याच कारणामुळे या जिल्ह्याचा समावेश आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागांमध्ये करण्यात आला आहे.
मात्र धाराशिवकडे एक नैसर्गिक फायदा आहे आणि तो म्हणजे त्याच्या विस्तीर्ण खुल्या पठारी भागांवरील सातत्यपूर्ण आणि जोरदार वारा वाहतो. पूर्वी फक्त एक भौगोलिक वैशिष्ट्य मानला जाणारा हा गुणधर्म आता आर्थिक संधीमध्ये बदलत आहे.
या संभाव्यतेची दखल घेऊन सेरेंटिका रिन्यूएबल्सने भूम, वाशी आणि कळंब तालुक्यांमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. कंपनी सुमारे 400 मेगावॅट क्षमतेच्या पवनचक्क्या (विंड टर्बाईन्स) उभारण्याची योजना आखत असून त्यातून स्वच्छ वीजेची (क्लीन एनर्जी) जवळपास 5 अब्ज युनिट्स निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्टरलाईट इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक आणि सेरेंटिका रिन्यूएबल्सचे चेअरमन प्रतिक अग्रवाल यांच्या हल्लीच झालेल्या भेटीत नवीकरणीय ऊर्जा, वीज वहन प्रकल्प आणि ऑप्टिकल फायबरमध्ये धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा वेगाने उभारण्यावर चर्चा झाली.

Follow us on social media:

महाराष्ट्रासाठी याचा अर्थ अधिक सक्षम आणि विश्वासार्ह हरित ऊर्जा पुरवठा हा आहे. तर धाराशिवसाठी याचा अर्थ नवीन गुंतवणूक, रोजगाराच्या संधी आणि भारताच्या नवीकरणीय ऊर्जावाढीत महत्त्वाचे योगदान देणारा जिल्हा म्हणून एक नवीन ओळख असा आहे.
हितधारकांच्या सहभागावर बळकट लक्ष केंद्रित
जर स्थानिक समुदायांना माहिती दिली नाही किंवा त्यांना सहभागी करून घेतले नाही तर अनेकदा मोठ्या प्रकल्पांना आव्हानांना सामोरे जावे लागते. धाराशिवमधील पवन ऊर्जा प्रकल्प सुरळीतपणे पुढे जात आहे यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हितधारकांसोबत पारदर्शक आणि सातत्यपूर्ण सहभागावर यात भर देण्यात आला आहे.
हा प्रकल्प राबवताना सेरेंटिकाने शेतकरी, गावातील सरपंच आणि अन्य महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि जिल्हा प्रशासन यांच्यासोबत घनिष्ठपणे काम केले आहे. जमिनीशी संबंधित सर्व प्रक्रिया पारदर्शक राहाव्यात आणि शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणींचे त्वरित निवारण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय देखरेख समितीचीही स्थापना केली आहे.
संवाद अधिक दृढ करण्यासाठी कंपनीने विशेषतः पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांसाठी खास टोल फ्री हेल्पलाइन (1800 202 8735) सुरू केली आहे. या हेल्पलाइनद्वारे शेतकरी जमीन करार, भरपाई किंवा शेतमालकांच्या शेतात जाण्याबाबतच्या अडचणी यांसारख्या मुद्द्यांवर थेट कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलू शकतात.
या साध्या पण विचारपूर्वक उचललेल्या पावलामुळे विश्वासात भर पडली असून समस्यांचे त्वरित निवारण होण्यासही मदत झाली आहे.
ऊर्जा विकासासोबतच समुदायांचे सशक्तीकरण
सेरेंटिकाचे या भागासोबत असलेले काम हे केवळ पवनचक्क्या उभारण्यापुरते मर्यादित नाही. कंपनीने इथल्या आणि आसपासच्या गावांतील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक उपक्रमही सुरू केले आहेत.
स्थानिक तरुणांना 21 दिवसांचे मूलभूत इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणाची संधी प्रदान करण्यात आली, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कौशल्ये शिकता आणि विकसित करता आली. या प्रशिक्षणार्थ्यांपैकी काहींना नोकऱ्याही मिळाल्या आहेत, तर काहींनी जवळपासच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये लहान इलेक्ट्रिकल सेवा व्यवसाय सुरू केले आहेत.
वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथे सेरेंटिकाने आरओ पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे, ज्यामुळे 100 हून अधिक घरांना पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागात, जिथे पाण्याच्या गुणवत्तेबाबत अनेकदा चिंता असते अशा ठिकाणी हा उपक्रम लोकांच्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचा अर्थपूर्ण बदल घडवणारा ठरला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सेरेंटिकाने दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर्सचे वितरण केले असून त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना हालचालीची सोय आणि स्वावलंबन वाढण्यास मदत झाली आहे.
आजूबाजूच्या गावांतील महिलांना शिवणकला प्रशिक्षणासोबत शिवणयंत्रे देण्यात आली, ज्यामुळे त्यांनी घरीच लहान व्यवसाय सुरू केले. अनेक कुटुंबांसाठी यामुळे उत्पन्नाचा एक विश्वासार्ह आणि अतिरिक्त स्रोत निर्माण झाला आहे.
दरवर्षी लाखो भाविक भेट देणाऱ्या तुळजापूर येथील नवरात्री उत्सवात सेरेंटिकाने मंदिर प्रशासनाला मदत म्हणून नऊ प्रथमोपचार (फर्स्ट एड) केंद्रांसाठी औषधांची व्यवस्था करून दिली. यामुळे गरज पडल्यास भाविकांसाठी तातडीची वैद्यकीय मदत सहजपपणे उपलब्ध होऊ शकली.
ग्रामीण भागातील शिक्षणाला हातभार लावण्यासाठी कंपनीने गावातील शाळांमध्ये स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवण्यास मदत केली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शहरांसारख्या आधुनिक शिक्षण (लर्निंग) साधनांचा (टूल्स) लाभ मिळू शकतो.
आरोग्यपूर्ण भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा
पवन ऊर्जा प्रकल्प हे केवळ वीज निर्माण करत नाहीत तर ते जीवाश्म इंधनांवरील (फॉसिल फ्युएल्स) अवलंबित्व कमी करण्यासही मदत करतात, यामुळे उत्सर्जन कमी होते आणि पर्यावरण अधिक स्वच्छ राहते.
ग्रिडमध्ये अधिकाधिक नवीकरणीय ऊर्जा समाविष्ट होत असल्याने शहरे आणि उद्योग आपल्या वीजेच्या गरजा कमी पर्यावरणीय पाऊलखुणांसह पूर्ण करू शकतात. कालांतराने यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते आणि राज्यातील लोकांसाठी अधिक निरोगी जीवनमान निर्माण होण्यास मदत होते.
भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट गैर जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे आणि महाराष्ट्रानेही आपल्या वीज निर्मितीत हरित ऊर्जेचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे वचन दिले आहे.
धाराशिवमध्ये उभारले जाणारे पवन ऊर्जा प्रकल्प हे दाखवून देतात की कशाप्रकारे नवीकरणीय ऊर्जा ही पर्यावरण क्रिया, ऊर्जा सुरक्षा आणि ग्रामीण विकास या तिन्ही गोष्टी एकत्र आणू शकते.
धाराशिवकडून मिळणारा कदाचित सर्वांत मोठा धडा हा आहे की पायाभूत सुविधा प्रकल्प हे केवळ लोकांसाठी नव्हेत तर लोकांसोबत उभे केले तरच ते खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. शेतकऱ्यांशी संवाद साधून, स्थानिक उपजीविकेला हातभार लावून आणि सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतवणूक करून सेरेंटिका रिन्यूएबल्सने हे दाखवून दिले आहे की मोठ्या प्रकल्पांच्या सुरळीत अंमलबजावणीमध्ये हितधारक व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.
आज धाराशिवच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या पवनचक्क्या या केवळ वीज निर्मितीच्या नव्हेत तर त्या नवीन संधी, स्वच्छ ऊर्जा आणि धाराशिव जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यासाठी अधिक सक्षम भविष्याचे यांचेही प्रतीक बनल्या आहेत.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!