नवी दिल्ली येथे इंडियन कोऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६ सोहळ्यात पुरस्कार प्रदान; संस्थेच्या व्यवसायवृद्धीची राष्ट्रीय स्तरावर दखल
धाराशिव – सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सातत्याने व्यवसायवृद्धी साधणाऱ्या पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव या संस्थेने राष्ट्रीय स्तरावर मानाचा पुरस्कार पटकावला आहे. संस्थेला प्रतिष्ठित ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित इंडियन कोऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६ या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्दिकी मुखीम मंजूर आणि महाव्यवस्थापक विश्वजित अविनाश देशमुख यांनी हा सन्मान स्वीकारला.
सहकार क्षेत्रातील संस्थेची उल्लेखनीय प्रगती, व्यवसायवृद्धी आणि सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा सन्मान म्हणजे संस्थेचे सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचेही संस्थेने म्हटले आहे.
राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या गौरवामुळे धाराशिवच्या सहकार क्षेत्राचा नावलौकिक वाढला असून, संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे.











