• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, November 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

घटस्थापनेच्या औचित्यावर तेरणा स्त्री शक्ती केंद्राचे उद्घाटन

MH25News by MH25News
October 4, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
घटस्थापनेच्या औचित्यावर तेरणा स्त्री शक्ती केंद्राचे उद्घाटन
0
SHARES
42
VIEWS

महिलांसाठी संकटमोचक; 9421211211 क्रमांकाची हेल्पलाइन

माता-भगिनींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबध्द – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – संकटात सापडलेल्‍या महिलांना सहाय्यता मिळण्यासह गरजेनुसार कायदेशीर, मानसिक, सामाजिक आधार  9421211211 या हेल्‍पलाइनच्‍या माध्यमातून उपलब्‍ध होणार आहे. शासकीय योजनांची माहिती व समुपदेशन सुविधादेखील महिलांना या क्रमांकाच्‍या माध्यमातून मिळणार आहे. सरकारी यंत्रणेमार्फत त्रस्त महिलेला तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी तेरणा स्त्री शक्ती केंद्र कटिबध्द असेल, अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

गुरूवारी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घटस्थापनेचे औचित्य साधून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी तेरणा स्त्री शक्ती केंद्र या हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी तेरणा स्त्री शक्ती केंद्राचे बोधचिन्ह व 9421211211 या हेल्पलाईन क्रमांकाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, ज्येष्ठ लेखिका कमलताई नलावडे, प्रांजल शिंदे,नंदाताई पुनगुडे,अ‍ॅड. मैना भोसले, अ‍ॅड. दीपाली जहागीरदार, अ‍ॅड. सुजाता माळी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

Follow us on social media:

पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घटस्थापनेला मोठे महत्व आहे.आजही महिलांच्या सुरक्षिततेबद्दल मोठा प्रश्न आहे.महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यासाठी,त्यांची सोय व्हावीसाठी आणि त्यांना अडचणीच्या वेळी मदत करता यावी यासाठी  हेल्पलाईनची अभिनव संकल्पना राबविण्यात येत असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.

तेरणा स्त्री शक्ती केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या अडचणी सोडविण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांची अडचण नोंदवून घेवून प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यांची समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न असणार आहे. महिलांची सुरक्षा, औद्योगिक, आरोग्यविषयक व उद्योजकीय समस्या किंवा समाजात वावरत असताना येणार्‍या वेगवेगळ्या अडचणी सोडविण्यासाठी तेरणा शक्ती केंद्राची टीम काम करेल. याला मोठा प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. त्यामुळे तेरणा शक्ती केंद्रातील समन्वयक शांतपणे महिलांची समस्या ऐकून घेवून ती तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाही दिली.

अधिक अपडेट्स साठी आमची फेसबूक पेज ला देखील फॉलो करू शकता

यावेळी प्रांजल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय योजनांमार्फत महिला केंद्रीत उपक्रम राबवून माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्याबाबत अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रियंका माळी, संध्या पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय मैंदर्गीकर यांनी केले. तर आभार तेरणा रेडीओचे कार्यक्रम व्यवस्थापक रमेश पेठे यांनी मानले. यावेळी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!