• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

MH25News by MH25News
August 28, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
0
SHARES
27
VIEWS

धाराशिव – तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी बनवण्यात आलेले ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना धाराशिव जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शंकर ठुबे यांनी हा निर्णय दिला. राजकीय दबावातून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद ढेपे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला, जो न्यायालयाने ग्राह्य धरला.

काय आहे प्रकरण?

सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्यावर विशाल छत्रे यांनी ६ मे रोजी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३५, ३३६, ३३७, ३४९, ३४० अन्वये गुन्हा दाखल केला होता. माने यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खोटा जबाब तयार करून तो प्रसिद्धीस दिला, ज्यामुळे आपली बदनामी झाली, असे छत्रे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात काही व्हॉट्सॲप ग्रुप्ससह ‘धाराशिव लाइव्ह’ या वेबपोर्टलचा उल्लेख करण्यात आला होता.याच प्रकरणात राजाभाऊ माने यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने यापूर्वीच दिलासा दिला आहे. मात्र, त्यानंतर पोलिसांनी ‘धाराशिव लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांना सुरुवातीला साक्षीदार आणि नंतर सहआरोपी म्हणून नोटीस बजावली. एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून हा त्रास दिला जात असल्याचा आरोप ढेपे यांनी केला आहे.

न्यायालयातील युक्तिवाद आणि निकाल

Follow us on social media:

पोलिसांच्या या कारवाईविरोधात सुनील ढेपे यांनी ॲड. अमोल वरुडकर यांच्यामार्फत धाराशिव जिल्हा न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शंकर ठुबे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत ॲड. वरुडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. “सुनील ढेपे यांनी केवळ आलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून बातमी प्रसिद्ध केली आहे. ड्रग्ज प्रकरणी आवाज उठवल्यामुळेच राजकीय दबावाखाली पोलिसांनी त्यांना आरोपी केले आहे,” असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत सुनील ढेपे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

“सत्याचा विजय झाला” – सुनील ढेपे

न्यायालयाच्या निर्णयानंतर सुनील ढेपे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. आलेल्या प्रेस नोटवरून सत्य बातमी प्रसिद्ध केली असताना, पोलिसांनी एका राजकीय नेत्याचे बाहुले बनून त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस सत्याचाच विजय झाला आहे.”

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!