• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, June 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ

MH25News by MH25News
October 16, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक
0
तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ
0
SHARES
95
VIEWS

भाविकांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन

धाराशिव – तुळजाभवानी मंदिर समितीच्या निधीमधून मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात आले आहे. पुरातत्व खात्याच्या निगराणीाखाली मंदिराचा सभामंडप पूर्ण उकलून पुन्हा मजबूत केला जाणार आहे. मंदिरासह आसपासचा भागही आपण मोकळा करून घेत आहोत. मंदिर आणि परिसराचे काम प्रत्यक्ष पुढच्या काही दिवसांत सुरू होणार आहे. कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये यामुळे गुणात्मक वाढ होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Follow us on social media:

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ तुळजाभवानीचे भाविक आणि सातारा गादीच्या महाराणी तथा खासदार उदयनराजे महाराज यांच्या सौभाग्यवती दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून येणार्‍या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरू असताना भाविकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता येईल, याकडे विचारपूर्वक लक्ष देण्यात आले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्थाही केली जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर अत्यंत उत्साहामध्ये आणि समाधानाने प्रत्येक भक्त आपल्या घरी जावा, असेही नियोजन आम्ही करीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी तुळजापूर आणि तुळजाभवानी मंदिराचा कायापालट करण्याच्या अनुषंगाने काही विषय प्रलंबित आहेत. लवकरच हे विषयही मार्गी लागतील. कारण मंत्रिमंडळाने या बाबतीत यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. मंगळवारी तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दाराच्या कामाचा शुभारंभ भाविकांच्या हस्तेच नारळ वाढवून करण्यात आला आहे. यात नव्याने केलेले बांधकाम काढणे,  भुयारी मार्ग, यज्ञमंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदिराचे जतन व दुरूस्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर कार्यालयीन प्रशासकीय इमारती, पोलीस चौकी, खुला प्रेक्षा मंच आदी नव्याने केलेेले बांधकाम काढले जाणार आहे. गोमुख तीर्थ, दत्त मदिर, मातंगी मंदिर, कल्लोळ तीर्थ, निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, दीपमाळ, शिवाजी महाद्वार व ओव्हर्‍या, खंडोबा मंदिर, यमाई मंदिराच्या जतन आणि दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. तिसर्‍या टप्प्यात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशा, आवश्यकतेनुसार दगडी पायर्‍या, महावस्त्र अर्पण केंद्राचेही जतन आणि दुरूस्तीचे काम नियोजित आहे. तुकोजीबुवा मठावरील ओव्हर्‍या, आराध्य खोली, दगडी फरशी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुळजाभवानी देवीचे मुख्य प्रवेशद्वार, त्याचबरोबर जिजामाता महाद्वाराची देखील दुरूस्ती आणि जतन केले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितली.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!