• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

निवडणुकीचा ‘फेक पोल’ दाखवणाऱ्या ‘त्या’ पेज वर अखेर गुन्हा दाखल

MH25News by MH25News
December 13, 2025
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
निवडणुकीचा ‘फेक पोल’ दाखवणाऱ्या ‘त्या’ पेज वर अखेर गुन्हा दाखल
0
SHARES
268
VIEWS

धाराशिव – नगरपालिका निवडणुकीदरम्यान पसरवण्यात आलेल्या बनावट एक्झिट पोल प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसानंतर धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात बनावट एक्झिट पोल व्हायरल करणाऱ्या धाराशिव 2.0, jilha dharashiv, all about dharashiv या पेजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका बनावट टीव्ही चॅनलच्या नावाखाली एका उमेदवाराला विजयी दाखवणारा फेक एक्झिट पोल व्हायरल करण्यात आला होता. मतदानापूर्वी अशाप्रकारे दिशाभूल करणारे साहित्य प्रसारित करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951, कलम 126(A) चे स्पष्ट उल्लंघन ठरते. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी “तात्काळ FIR करा” असा कठोर आदेश जारी केला होता. ओंकार देशमुख यांनी आदेश काढुनही गुन्हा दाखल होत नसल्याने युवासेना आक्रमक झाली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील ठाकरे सेनेकडून देण्यात आला होता. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तात्काळ धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आदेश दिल्यानंतरही तब्बल नऊ दिवस कारवाई न झाल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याने प्रकरणात गती येण्याची शक्यता आहे. तरीही, उशीर का झाला? आदेश असूनही FIR त्वरित नोंदवली गेली नाही, यामागे नेमके कोणाचा दबाव होता? असा प्रश्न नागरिकांमध्ये अद्यापही तीव्रतेने कायम आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली असून बनावट एक्झिट पोल तयार करणारे आणि व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाने धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोणत्या कलमांनुसार करण्यात आला गुन्हा दाखल?

Follow us on social media:

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 126 (A), BNS 2023-223, 337, 353, IT ACT – 66(5) या कलमान्वये धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश दरम्यान सदर प्रकरणात, युवा सेनेचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी फेक एक्झिट पोल प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना स्वयंस्पष्ट अहवाल देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!