• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, November 9, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी📰 प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

MH25News by MH25News
November 9, 2026
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
0
SHARES
74
VIEWS

तीन आगींच्या घटनांनी प्रशासनाचे पितळ उघडे; उमरगा नगरपालिकेच्या उसनवारीच्या एका वाहनावर संपूर्ण शहराची अग्निसुरक्षा!

आग लागली तर मदत मागायची कुणाकडे? एकाच वेळी दोन ठिकाणी आग लागली तर काय करणार? नगरपालिकेने आजवर स्वतःच्या अग्निशमन वाहनांसाठी काय पाठपुरावा केला?

धाराशिव – जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरात आगीच्या घटना घडत असताना अग्निशमन व्यवस्थेची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या नगरपालिकेकडे स्वतःचे एकही अग्निशमन वाहन नाही. विशेष म्हणजे, शहरातील आगी विझवण्यासाठी उमरगा नगरपालिकेकडून उसनवारीवर आणलेल्या एकाच वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. रविवारी दोन आणि सोमवारी पहाटे अशा अवघ्या दोन दिवसांत आगीच्या तीन घटना घडल्या आणि तिन्ही ठिकाणी याच एका वाहनाला धाव घ्यावी लागली. मग शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? की मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यानंतरच नगरपालिका जागी होणार?

रविवार, ८ नोव्हेंबर रोजी कौडगाव एमआयडीसी परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पाला आग लागली. त्याच दिवशी धाराशिव शहरातील समतानगर परिसरातही आग लागली. या दोन्ही घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उमरगा नगरपालिकेकडून आणलेल्या एकाच अग्निशमन वाहनाचा वापर करण्यात आला. त्यानंतर सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी पहाटे येडशी येथे आग लागली. तिथेही हेच वाहन रवाना झाले. तीन घटनांमध्ये एकच वाहन धावत असताना शहरात दुसरीकडे मोठी आग लागली असती तर काय परिस्थिती निर्माण झाली असती, याचा विचारही अंगावर शहारे आणणारा आहे.

दीड लाख लोकसंख्या, पण अग्निशमन वाहन शून्य!

धाराशिव शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. बाजारपेठा, व्यापारी संकुले, निवासी इमारती, गोडाऊन, एमआयडीसी आणि गर्दीची सार्वजनिक ठिकाणे वाढत आहेत. धार्मिक उत्सव, मिरवणुका आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये हजारो नागरिक सहभागी होतात. मात्र, अशा शहराच्या सुरक्षेसाठी नगरपालिकेकडे स्वतःचे अग्निशमन वाहनच नाही. शहराच्या गरजेनुसार किमान तीन अग्निशमन वाहने असावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना प्रत्यक्षात उसनवारीच्या एका वाहनावर संपूर्ण यंत्रणा अवलंबून आहे.

नगरपालिकेचा पाठपुरावा नेमका कुठे अडला?

Follow us on social media:

अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी नगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे का? वाहन खरेदीसाठी निधीची मागणी केली आहे का? नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद आहे का? लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने यासाठी कोणत्या स्तरावर पाठपुरावा केला? या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.

राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी पक्षाची सत्ता असताना स्थानिक पातळीवरही सत्तेचे समीकरण अनुकूल असल्याचा दावा केला जातो. मग या सत्तेचा उपयोग शहराच्या मूलभूत अग्निसुरक्षेसाठी कधी होणार? विकासाच्या घोषणा आणि राजकीय कार्यक्रमांपलीकडे नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी ठोस नियोजन कधी होणार?

आग लागल्यानंतर वाहन शोधायचे की आग लागण्याआधी व्यवस्था उभी करायची?

समजा शहराच्या एका भागात मोठी आग लागली आणि त्याचवेळी दुसऱ्या भागातही दुर्घटना घडली, तर दुसऱ्या ठिकाणी अग्निशमन वाहन कोणते पाठवणार? उमरगा नगरपालिकेचे वाहन उपलब्ध नसेल तर पर्यायी व्यवस्था काय? वाहन बिघडले किंवा दुसऱ्या ठिकाणी अडकले तर आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळणार?

हे प्रश्न केवळ प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी नाहीत, तर दीड लाख नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे.

धाराशिव नगरपालिकेने तातडीने स्वतःची अग्निशमन वाहने खरेदी करावीत, प्रशिक्षित कर्मचारी, आवश्यक उपकरणे आणि पर्यायी आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध करावी. अन्यथा उद्या एखाद्या आगीच्या घटनेत जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित राहणार नाही. धाराशिवकरांना विकासाच्या घोषणा नकोत, संकटाच्या वेळी वेळेत पोहोचणारी अग्निशमन यंत्रणा हवी आहे!

संबंधित बातम्या

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026
मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
ग्रामीण

मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी

October 27, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
ग्रामीण

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?

October 24, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!