शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी
धाराशिव – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणारी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच आवश्यक कार्यालयीन पदे तातडीने भरण्याची मागणी शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांनी केली.
वाशी तालुक्यातील रिक्त विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदे प्राधान्याने भरावीत, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, वाशी येथे आवश्यक कार्यालयीन कर्मचारी उपलब्ध करून प्रशासन अधिक सक्षम करावे, तसेच वाशी बीट हे तालुक्यातील सर्वात मोठे बीट असल्याने तेथील रिक्त विस्तार अधिकारी पद तातडीने भरावे, अशी मागणी करण्यात आली. वाशी, पारा आणि सरमकुंडी ही केंद्रे उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी, शिक्षकांना सक्षम प्रशासन मिळण्यासाठी आणि पालकांना दर्जेदार शिक्षण व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिकाही यावेळी व्यक्त करण्यात आली.











