• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

MH25News by MH25News
June 15, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
0
SHARES
65
VIEWS

धाराशिव – सध्या सुरु असलेल्या आखाती युध्दाने देशाचे उर्जेसाठी असणारे स्वावलंबन आधोरेखीत केले आहे. त्यातच हरित उर्जेला अनन्यसाधारण महत्व आहे. हरीत ऊर्जेच्या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या वाटचालीकडे पाहिले असता धाराशिव जिल्ह्यातील पवनउर्जा व सौर उर्जेसाठी असणार्‍या पोषक वातावरणामुळे धाराशिव जिल्हा हा पवनउर्जेचे ’पॉवरहाऊस’ ठरतो आहे.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (MEDA) उपलब्ध माहितीनुसार, राज्यात सध्या सुमारे ६२३ पवनऊर्जा प्रकल्प कार्यरत असून त्यापैकी ३०० हून अधिक प्रकल्प एकट्या धाराशिव जिल्ह्यात आहेत. ही संख्या राज्यातील कोणत्याही एका जिल्ह्यातील सर्वाधिक मानली जाते. त्यामुळे धाराशिवने पवनऊर्जा क्षेत्रात विक्रमी आघाडी घेतली आहे.
पवनऊर्जा प्रकल्पांच्या संख्येत मराठवाडा विभागाने राज्यात विशेष स्थान मिळवले आहे. धाराशिवसह बीड, लातूर आणि नांदेड परिसरातील पठारी भूभाग पवनऊर्जेसाठी पोषक असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. वाहणार्‍या वार्‍याच्या शक्तीमुळे पवनचक्कीची पाती फिरतात. या फिरत्या गतीचे रूपांतर जनरेटरद्वारे विद्युत ऊर्जेत केले जाते. कोणत्याही इंधनाची आवश्यकता नसल्याने पवनऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा मानली जाते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी पवनऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
केंद्र व राज्य शासनाने अक्षय ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर दिला असून भविष्यात पवन आणि सौर ऊर्जा क्षेत्रात आणखी गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत धाराशिव जिल्हा महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा क्रांतीचा प्रमुख केंद्रिंबदू म्हणून उदयास आला आहे.

जिल्ह्यात सध्या १० ते ११ पवनउर्जा कंपन्या काम करत आहेत. जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाचेही या कंपन्याना योग्य ते सहकार्य मिळत आहे. पवनउर्जा कंपन्या तसेच शासनाच्या योग्य समन्वयामुळे कंपन्याचा कामांना गती मिळत आहे. त्यामुळे राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी सुमारे अर्ध्या पवनचक्क्या या केवळ धाराशिव जिल्ह्यात आहेत. ही धाराशिव जिल्ह्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
पवन ऊर्जा व सौर ऊर्जा हे ऊर्जेचे अतीशय स्वच्छ, शाश्वत स्रोत असून पर्यावरणसाठी पूरक आहेत. धाराशिव सारख्या आकांक्षीत जिल्ह्याच्या विकासासाठी, शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी, तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी अशा प्रकल्पाची गरज आहे. धारशिवमध्ये पवन ऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार आणि आर्थिक हालचालींमध्ये वाढ झाली आहे. तथापि, दुर्दैवाने काही असे घटक देखील आहेत जे या कामांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात. शेतकरी आणि कंपन्यांमधील नुकसानभरपाई निश्चित करणे, मार्गाचा अधिकार (Right of Way) मिळवणे आणि व्यवसायाशी संबंधित सर्व परवानग्या देणे यांसारखे वाद/प्रश्न धारशिव जिल्हा प्रशासन स्वतःहून (सक्रियपणे) सोडवत आहे.

  • किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!