• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, August 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

MH25News by MH25News
March 27, 2026
in अर्थव्यवस्था, क्रीडा, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
0
SHARES
27
VIEWS

सोलापूर – सह-प्रयोजक सेरेंटिका रिन्युएबल्स आणि आयोजक निरझरा केअर फाउंडेशनच्या यांच्या वतीने कै. सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने ४ थी ‘महिला महाराष्ट्र केसरी’ तसेच वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा – २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसोबतच खुल्या गटातील पुरुष कुस्ती स्पर्धांचाही समावेश करण्यात आला असून, राज्यभरातील नामांकित महिला व पुरुष पैलवानांचा सहभाग अपेक्षित आहे.

ही स्पर्धा २८ ते २९ मार्च २०२६ रोजी सायं. ५ ते ९ या वेळेत सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला, होम मैदान परिसरात पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेला उजाळा देणारी ही स्पर्धा ऐतिहासिक ठरणार असून, महिला शक्तीचा भव्य संग्राम पाहायला मिळणार आहे.

Follow us on social media:

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मा. ना. मेघना बोर्डीकर, आमदार मा. श्री. सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मा. खा. श्री. रामदासजी तडस, उपाध्यक्ष मा. ना. श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थितीत राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, दिलीपराव सोपल, नारायण पाटील, उत्तमराव जानकर, तसेच महापौर विनायक कोंड्याल आदींचा समावेश आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास ‘किया सोनेट’ कार, तर उपविजेत्यास ‘बुलेट’ बाईक देण्यात येणार आहे. याशिवाय विविध वजन गटांमध्ये रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून, प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रक्कम देण्यात येणार आहे.

पुरुष गटातील कुस्ती स्पर्धांमध्ये विविध वजन गटांनुसार ४,००० ते ३०,००० रुपयांपर्यंत बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. ‘वजनाची अट असून वयाची अट नाही’ या निकषावर ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.

हरितऊर्जा निर्मिती मधील अग्रेसर असलेली सेरेंटिका रिन्यूएबल्स ही या स्पर्धेची सहप्रायोजक आहे. ही कंपनी कायमच महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असते. कंपनीच्या वतीने नुकतेच महिला दिनाचे औचित्य साधत धाराशिव जिल्ह्यातील २० महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देवून त्या महिलांना शिलाई मशिनचे वितरणही केले आहे. तसेच महिलांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठीही छोटासा प्रयत्न कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!