• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

नवरात्र उत्सवात नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान

MH25News by MH25News
September 19, 2025
in अर्थव्यवस्था, उद्योग, कृषी, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
नवरात्र उत्सवात नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान
0
SHARES
82
VIEWS

तुळजाभवानी मंदिर संस्थान राबवणार उपक्रम

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव २०२५ या कालावधीत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला विशेष सामाजिक परिमाण लाभावे, महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘नऊ दिवस – नऊ सन्मान’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दररोज एका महिलेला अशा प्रकारे नवरात्र उत्सव काळात एकूण नऊ महिलांना गौरविण्यात येणार आहे. महिलांची निवड करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

या नऊ महिलांचा होणार सन्मान –

Follow us on social media:

१) अस्मिता अविनाश सूर्यवंशी, रा. गुंजोटी ता. उमरगा – शेवया उत्पादक गटात नावलौकिक, तसेच ‘घे भरारी’ टीव्ही शो विजेत्या.
२) बाबई उर्फ सुजाता लक्ष्मण चव्हाण, रा. अणदूर ता. तुळजापूर – बालविवाह प्रतिबंध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य.
३) अनिता नामदेव देवकते, रा. सौंदणा आंबा ता. कळंब – आवळा उत्पादने निर्मिती, प्रेरणादायी एकल महिला यशोगाथा.
४) प्रियंका रघुवीर पासले, रा. तीर्थ ता. तुळजापूर – विविध उपजीविका उपक्रम आणि संघर्षमय प्रवास.
५) सारिका रामेश्वर येळेकर, रा. बेंबळी ता. धाराशिव – शेळीपालन क्षेत्रात कार्य.
६) रोहिणी धीरज सुरवसे, रा. वाखरवाडी ता. धाराशिव – शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे केला.
७) नंदा राजेश जगताप, रा. वाघेगव्हाण ता. परांडा – मासिक पाळी व्यवस्थापन व पोषण परसबाग याबाबत जागृती.
८) वैशाली जाधव, रा. गणेगाव ता. भूम – एकल महिला सक्षमीकरणासाठी काम.
९) लक्ष्मी कल्याण मोरे, रा. बेंडकाळ ता. लोहारा – सेंद्रिय शेती प्रचार व प्रसार क्षेत्रात योगदान.

याशिवाय, या महोत्सवात पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक व संवर्धक पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या रहिवासी असलेल्या राहीबाई पोपेरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व ओळखून देशी बियाण्यांची बँक सुरू केली. त्यांच्या या कार्याचा गौरव करत भारत सरकारने २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे. तसेच बीबीसीने जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला होता.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या या सन्मानामुळे समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना प्रेरणा मिळणार आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!