• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मविआचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमुक्त करु – खा. ओम राजेनिंबाळकर यांचे आश्वासन

MH25News by MH25News
November 7, 2024
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
मविआचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमुक्त करु – खा. ओम राजेनिंबाळकर यांचे आश्वासन
0
SHARES
166
VIEWS

धाराशिव – महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावेळी सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, याहीवेळी सत्ता आल्यास शेतकरी कर्जमुक्त करणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.त्यामुळं मोठ्या मतांनी आपले उमेदवार निवडून द्या असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. कळंब विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ पळसप येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत विविध मुद्द्यांवरून सरकारवर घणाघाती टीका केली.

राजेनिंबाळकर म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनाचा योग्य दर मिळत होता. त्यावेळी सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल ११ हजार रुपये होता, मात्र सध्याच्या महायुती सरकारच्या कारभारामुळे तो दर आता फक्त चार ते साडेचार हजार रुपयांवर घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे.” याच मुद्द्यावरून ते म्हणाले की, “एकीकडे महायुती सरकार दरमहा दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना सहकार्य देण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात सात हजार रुपयांचे नुकसान करत आहे. हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मोठा फटका देणारे आहे.”

तसेच त्यांनी धाराशिव – कळंब मतदारसंघातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य केले. “आज नोकऱ्यांच्या अभावामुळे धाराशिव – कळंबचा तरुण वर्ग पुणे आणि मुंबईकडे स्थलांतरित होत आहे. पण हे स्थलांतर केवळ रोजगाराच्या संधींअभावी होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या संधी आणण्याची महायुती सरकारची असमर्थता यामुळे दिसून येते. पुण्यात येऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे दोन लाख लोकांचा रोजगार बुडाला. हे फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच झाले आहे,” असे निंबाळकर म्हणाले.

Follow us on social media:

याशिवाय, निंबाळकर यांनी तेर येथे संत गोरोबा काका मंदिराच्या विकासासाठी घेतलेल्या भूमिकेवरून भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली. “संत गोरोबा काका मंदिराचा विकास करण्यासाठी राणा पाटील यांनी स्वतःची जमीन देण्याऐवजी एका गरीब व्यक्तीची जमीन अधिग्रहित केली. हे केवळ गरिबांच्या हक्कांवर अन्याय करणारे आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारे पाऊल आहे. राणा पाटील हे गरिबांच्या घरावर नगर फिरवतात,” असे निंबाळकर यांनी आरोप केले.

या सभेत शेतकरी, बेरोजगार युवक, गरीब आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. महाविकास आघाडीने या सभेतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि बेरोजगारांच्या रोजगाराच्या संधीसाठी आवाज उठवला. धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात या सभेचा प्रभाव पडण्याची शक्यता असून, निवडणूक प्रचाराला एक नवी दिशा मिळाली आहे.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!