• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सातवाहन कालीन तीर्थकुंडासाठी साडेतीन कोटी – आ. राणाजगजितसिंह पाटील

MH25News by MH25News
December 12, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
सातवाहन कालीन तीर्थकुंडासाठी साडेतीन कोटी – आ. राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
36
VIEWS

जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने तेरचे आणखी एक पाऊल : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – तब्बल दोन हजार वर्षांपेक्षा अधिक पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या प्राचीन तीर्थकुंडासाठी तीन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी या तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनासाठी एक कोटी ६४ लाख रुपये उपलब्ध झालेले आहेत. एकूण पाच कोटी ११ लाख रुपयांच्या माध्यमातून इ.स. पहिल्या शतकातील घडामोडींचे साक्षीदार असलेल्या या प्राचीन तीर्थकुंडाला आता नवी झळाळी मिळणार आहे. त्यामुळे तेर येथील प्राचीन अवशेषांची ठळक ओळख जगासमोर येणार आहे. त्यातून जगभरातील अभ्यासक आणि पर्यटक या वारसा स्थळांकडे आकर्षित होतील. त्यामुळे तेरची जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने सक्षम वाटचाल सुरू असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Follow us on social media:

संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाराशिव तालुक्यातील तेर येथे आजही मोठा ऐतिहासिक वारसा पाहायला मिळतो. येथील अनेक प्राचीन अवशेष आणि साधने उत्खननात आढळून आली आहेत. त्यामुळे तेर आणि परिसरातील इतिहासाच्या पाऊलखुणांनी जगभरातील अभ्यासक आणि पर्यटकांना नेहमीच आकर्षित केले आहे. तेर येथे सन १९८७ – ८८ या कालावधीत प्रदीप केशवराव व्यास यांच्या शेतामध्ये उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी या सातवाहन कालीन तीर्थकुंडाचे अवशेष समोर आले. पक्क्या विटांनी बांधल्या गेलेल्या या तीर्थकुंडाच्या उत्खननात हस्तिदंती फणी, लज्जागौरीची शिल्प यासह बरीच सातवाहनकालीन नाणीही प्राप्त झाली होती. पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनासाठी पाच कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात आपल्याला यश मिळाले आहे. यापूर्वी १ कोटी ६२ लाख रुपये उपलब्ध झाले असून त्यातून तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरूही करण्यात आले आहे. उर्वरित कामासाठी बुधवार १० डिसेंबर रोजी तीन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी आपल्या महायुती सरकारने मंजूर केला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सध्या तेर येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आपण मोठा पाठपुरावा करून १३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्राचीन तीर्थकुंडासाठी ५ कोटी ११ लाख, बौद्ध स्तूप विकसित करण्यासाठी २ कोटी २१ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. राज्यातील सर्वात पुरातन मंदिर अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराचे रु.२ कोटी ९० लाख निधीतून जतन आणि संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. आपल्या महायुती सरकारने तेर आणि परिसरातील प्राचीन वास्तू आणि मंदिरांना गतवैभव मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. तेरला जागतिक पर्यटन केंद्राच्या नकाशावर आणण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याने मोठे आत्मिक समाधान लाभत आहे. हजारो वर्षापासून तेरच्या प्राचीन भूमीवरुन एक समृद्ध नागरी वस्तीची अनेक अभिमानस्थळे आजही आपल्याला पहायला मिळतात. दोन हजार वर्षाचा हा समृद्ध वारसा अनुभवता यावा यासाठी तेरला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!