धाराशिव – सेरेंटीका रिन्यूएबलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाशी, भूम व कळंब तालुक्यातील २० महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. कळंब तालुक्यातील गौर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात गावच्या सरपंच सुषमा देशमुख, सेरेंटीका रिन्यूएबल्सचे व्हाईस प्रसिडेंट सुरजित नारायण यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
सेरेंटीका रिन्यूएबल्सच्या वतीने वाशी, भूम व कळंब तालुक्यातील २० महिलांची निवड करुन त्यांना येरमाळा येथे १० दिवसाचे शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आज कळंब तालुक्यातील गौर येथील हुतात्मा स्मारक येथे या शिलाई मशिन तसेच प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास गौरच्या सरपंच सुषमा धनंजय देशमुख, सेरेंटीका रिन्यूएबल्सचे व्हाईस प्रसिडेंट सुरजित नारायण, व्हाईस प्रसिडेंट (लँड) प्रकाश पटेल, कळंब प्रकल्प व्यवस्थापक हरीष कुमार, उषा सिलाई स्कूलचे परेश नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दिपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाचे पुजन करण्यात आले. त्यानंतर परेश नागपुरे यांनी प्रास्ताविकात हा उपक्रम राबविण्यामागील भुमिका स्पष्ट केली. सरपंच सुषमा देखमुख यांनीही यावेळी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पुर्ण करणाNया महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, शिलाई मशिनचे वितरण करण्यात आले.

महिलांनी मानले सेरेंटिकाचे आभार
यावेळी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या राजर्षी गपाट, शिला दिवाने, सुवर्णा घोडके, उमा शितोळे या महिलांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी महिलांसाठी हे प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल सेरेंटीका वंâपनीचे आभार व्यक्त केले. तसेच एक महिला सुधारली तर एक कुटुंब सुधारते, वंâपनीने प्रशिक्षण देवून शिलाई मशिन देखील उपलब्ध करुन दिल्याने महिलांना स्वताःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिल्याचे त्या म्हणाल्या.
“सेरेंटिकाचे रिन्युएबल्सचे ज्या भागात प्रकल्प चालू आहेत. त्या भागातील माता, भगिनी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा शिलीई मशिन प्रशिक्षण व वितरणाचा उपक्रम राबवत आहोत. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहेत. या महिलांच्या पुढील वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा” – शिलाई मशीन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या महिलांना शुभेच्छा देत सुरजित नारायण, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, सेरेंटिका रिन्युएबल्स यांनी कार्यक्रमाची सांगता केली.











