• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आमदार साहेब रुसले, पुण्यात जाऊन बसले

MH25News by MH25News
June 7, 2025
in अर्थव्यवस्था, आरोग्य, उद्योग, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
आमदार साहेब रुसले, पुण्यात जाऊन बसले
0
SHARES
1.1k
VIEWS

जनतेने तुमचं काय घोडं मारलं? थोडक्या मताने का होईना त्यांनीच तुम्हाला तारलं

वैभव पारवे – विधानसभेचा निकाल लागून जवळपास सहा महिने उलटले मात्र शिंदेंच्या सेनेचे नाराज माजी मंत्री तथा भूम परांडा वाशी विधानसभा मतदार संघाचे आमदार तानाजी सावंत हे अद्यापही मतदार संघात फिरकलेच नाहीत.

सत्ता परिवर्तनासाठी दीडशे बैठका घेणारे व कोणत्या ना कोणत्या विधानामुळे सतत चर्चेमध्ये असणारे तानाजी सावंत यांचा अवघ्या 1509 मताच्या फरकाने विजय झाला आहे. राहूल मोटे यांनी सावंतांना कडवी झुंज दिली होती. मात्र जनतेच्या थोडक्या का होईना मताधिक्यामुळे सावंतांची ‘डुबती नौका’ पार नेली होती.

अन् तानाजी सावंत ट्रोल झाले

मागील आठवड्यात अवकाळी पाऊस धो-धो बरसला. सावंतांच्या मतदार संघातील वाशी तालुक्यात तर पाऊस मुक्काम ठोकून होता. झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने वाशी, तेरखेडा परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान पाहण्यासाठी किंवा बळीराजाची व्यथा जाणून घेण्यासाठी आमदार महोदयांचे पाय आपल्या बांधाला लागतील याची आशा शेतकरी वर्गाला होती मात्र, आमदार साहेब तेव्हा देखील मतदार संघात फिरकले नाहीत. पण, पुण्यातील कात्रज चौकामधील आमदार साहेबांचा ट्रॅफिक सुरळीत करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी सावंत यांना ट्रोल करण्यास सुरू केले.

Follow us on social media:

आता तरी ‘आमदार मतदार’ संघात दिसतील का?

वाशी तालुक्यात पवनचक्की कंपन्यांचे जाळे हळू-हळू पसरत आहे. पवनचक्की कंपन्यांकडून पवनचक्की उभारणीसाठी पर्यावरणाची दुर्दशा करत असल्याचे तसेच जमिनीसाठी शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कंपन्यांवर किंवा प्रशासनाला जाब विचारणारे कोणीच नसल्यामुळे जनतेचा वाली म्हणवणाऱ्या आमदार महोदयांकडून अपेक्षा असल्याने ते आतातरी मतदार संघात दिसतील का? असा सवाल तालुक्यातील बळीराजा विचारत आहे.

मतदार संघात आमदार ही नाही आले अन् निधी ही नाही?

विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या तसेच मतदार संघात परिवर्तन घडवणाऱ्या सावंतांनी आपल्या मतदार यंदा किती रुपयांचा विकास निधी आणला असा प्रश्न देखील मतदार संघातील जनता विचारत आहे. तुम्ही येत नाहीत कमीत कमी विकास निधी तरी आमच्यासाठी पाठवा अशी चर्चा चौका-चौकातील गप्पांमध्ये सुरू आहे.

मंत्री पदी वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेल्या तानाजी सावंत यांनी मतदार संघात येणे टाळले आहे. शासकीय कार्यक्रम असो किंवा पक्षाचा कार्यक्रम असो तानाजी सावंत यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवत नाराज असल्याने अनेकदा दाखवून दिले आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे शिंदेंच्या सेनेकडे असूनही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत तानाजी सावंत यांची अद्यापही खुर्चीला खुर्ची लागली नसल्याने सावंत हे पक्षातच नाराज असल्याचे बोलले जात असून त्यांची नाराजी कधी दूर होईल व ते कधी मतदार संघात दिसतील याची प्रतीक्षा मतदार संघातील जनतेला लागून राहिली आहे.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!