• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

घटस्थापनेच्या औचित्यावर तेरणा स्त्री शक्ती केंद्राचे उद्घाटन

MH25News by MH25News
October 4, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
घटस्थापनेच्या औचित्यावर तेरणा स्त्री शक्ती केंद्राचे उद्घाटन
0
SHARES
41
VIEWS

महिलांसाठी संकटमोचक; 9421211211 क्रमांकाची हेल्पलाइन

माता-भगिनींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबध्द – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – संकटात सापडलेल्‍या महिलांना सहाय्यता मिळण्यासह गरजेनुसार कायदेशीर, मानसिक, सामाजिक आधार  9421211211 या हेल्‍पलाइनच्‍या माध्यमातून उपलब्‍ध होणार आहे. शासकीय योजनांची माहिती व समुपदेशन सुविधादेखील महिलांना या क्रमांकाच्‍या माध्यमातून मिळणार आहे. सरकारी यंत्रणेमार्फत त्रस्त महिलेला तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी तेरणा स्त्री शक्ती केंद्र कटिबध्द असेल, अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

गुरूवारी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घटस्थापनेचे औचित्य साधून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी तेरणा स्त्री शक्ती केंद्र या हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी तेरणा स्त्री शक्ती केंद्राचे बोधचिन्ह व 9421211211 या हेल्पलाईन क्रमांकाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, ज्येष्ठ लेखिका कमलताई नलावडे, प्रांजल शिंदे,नंदाताई पुनगुडे,अ‍ॅड. मैना भोसले, अ‍ॅड. दीपाली जहागीरदार, अ‍ॅड. सुजाता माळी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

Follow us on social media:

पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घटस्थापनेला मोठे महत्व आहे.आजही महिलांच्या सुरक्षिततेबद्दल मोठा प्रश्न आहे.महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यासाठी,त्यांची सोय व्हावीसाठी आणि त्यांना अडचणीच्या वेळी मदत करता यावी यासाठी  हेल्पलाईनची अभिनव संकल्पना राबविण्यात येत असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.

तेरणा स्त्री शक्ती केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या अडचणी सोडविण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांची अडचण नोंदवून घेवून प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यांची समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न असणार आहे. महिलांची सुरक्षा, औद्योगिक, आरोग्यविषयक व उद्योजकीय समस्या किंवा समाजात वावरत असताना येणार्‍या वेगवेगळ्या अडचणी सोडविण्यासाठी तेरणा शक्ती केंद्राची टीम काम करेल. याला मोठा प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. त्यामुळे तेरणा शक्ती केंद्रातील समन्वयक शांतपणे महिलांची समस्या ऐकून घेवून ती तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाही दिली.

अधिक अपडेट्स साठी आमची फेसबूक पेज ला देखील फॉलो करू शकता

यावेळी प्रांजल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय योजनांमार्फत महिला केंद्रीत उपक्रम राबवून माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्याबाबत अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रियंका माळी, संध्या पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय मैंदर्गीकर यांनी केले. तर आभार तेरणा रेडीओचे कार्यक्रम व्यवस्थापक रमेश पेठे यांनी मानले. यावेळी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!