राणा पाटील,शिवसेना फोडून युती अभेद्य कशी राहील?
योगेश केदार यांचा सवाल
धाराशिव – धाराशिव मध्ये महायुती अभेद्य आहे, पण काही नेत्यांना शिवसेना पक्षात फूट पाडून हा डोळ्यात डोळे घालून बघणारा पक्ष कमजोर करायचा आहे. हा उघड अजेंडा राणा पाटील यांच्या सोबत मिळून शिवसेनेचेच काही नेते राबवत आहेत. काल परवा प्रताप सरनाईक साहेबांच्या सोबत जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना काहिजण भेटले. त्यापैकी काहींनी लगेच तानाजी सावंत साहेबांच्या गटाला वगळून धाराशिव मध्ये सत्ता स्थापन करणार! अश्या बातम्या पेरल्या. त्यात आघाडीवर होता तो राणा पाटलाचा मल्हार पाटील अन गँग. या गोष्टी का म्हणून केल्या जात आहेत? तानाजी सावंत सर शिवसेनेत नाहित का? आमच्या सारखे शिवसेना पक्षाच्या हितासाठी राणा पाटलाच्या चुकीवर बोट ठेवत आहेत, तर लगेच योगेश केदार हे तानाजी सावंतांच्या गटाचे आहेत अश्या वावड्या पेरल्या जात आहेत. राणा पाटलाचा विरोध म्हणजे शिवसेनेत गटबाजी असा अर्थ जर कोणी काढत असेल तर त्याचा हेतू तपासणे गरजेचे आहे.
तरी मी स्पष्ट करू इच्छितो की मी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करतो. त्यांनी मला जवळ केले, जबाबदारी दिली. माझी निष्ठा त्यांच्या सोबत आहे. धाराशिव जिल्ह्यात माझा कुणी एक नेता नाही. माझ्यासाठी शिवसेना पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते माझे नेते आहेत.
असो, मुळात शिवसेना पक्षाच्या चिन्हावर त्यांचे उमेदवार घुसवले आणि निवडून आल्यावर त्यांना पळवून नेले. शिंदे साहेबांना जेंव्हा हा विषय समजला तेंव्हा त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत पळवून नेलेले उमेदवार समोर आणले जाणार नाहीत तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही. शिंदे साहेबांच्या कडक भूमिकेनंतर अनेक दिवस विचार करून त्या उमेदवारांना आणले गेले. यातून शिवसेनेत त्यांनी त्यांची माणसे पेरली असल्याचे सिध्द झाले. बरेच लोक उघडे पडले. अजून बरेच नेतेगण आहेत जे तुमची स्लीपर सेल म्हणून काम करत आहेत. आतून घात करत आहेत. त्यांच्या विषयी पुरावे समोर येत आहेत. योग्य वेळी पक्ष नेतृत्वाकडे ते सादर करुच.
माझे राणा पाटलांना आवाहन आहे. जिल्हापरिषद अध्यक्ष तुमच्याच घरातला करा. तशी उघड पत्रकार परिषद घ्या ना! तुम्हाला कोण रोखले आहे? जर वरिष्ठांनी आदेश दिल्यास आमचाही विरोध असण्याचे कारण नाही. परंतु शिवसेना पक्ष फोडण्यासाठी तुम्ही चालवलेले चाळे बंद करा. तुम्हाला काय वाटते मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या पर्यंत केवळ तुमचीच पोहोच आहे? तुम्ही जे काही खोटे नाटे सांगाल तेच भाजपचे नेते मान्य करतील असा समज काढून टाका. तुम्ही मूळ भाजप कशी संपवत आहात हे संघातील आणि भाजप च्या नेत्यांना समजत आहे. या जिल्हापरिषद निवडणुकीत केवळ स्वतःच्या बायकोला जिल्हापरिषद अध्यक्ष करण्यासाठी तुम्ही भाजपातील इतर सर्व ओपन महिला उमेदवारांना पराभूत करवून खड्यासारखे बाजूला केले. भारतीय जनता पार्टी चा स्ट्राईक रेट ५०% पेक्षा खाली आला. त्याला कारणीभूत तुमचा छुपा अजेंडा आहे. अनेक दशके काम करणाऱ्या भाजप नेत्यांची तुम्ही काय गत करून ठेवली? हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत नाही काय? ज्या दिवशी भाजप सत्तेच्या बाहेर जाईल त्यानंतर किती दिवस तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते भाजप माध्ये राहतील ? याचाही अभ्यास भाजप ला आहे. असो, त्याविषयी भाजपचे जिल्ह्यातील नेते वरती बोलतीलच. आम्हाला त्यात बोलायचा अधिकार नाही.
महायुती ही झालीच पाहिजे. पण शिवसेना आणि भाजप अशी बरोबरीने तसेच सन्मानाने युती व्हावी. एकमेकांचा उचित सन्मान राखून युती करायला सुरुवातीपासून कुणाचीच अडचण नव्हती. परंतु आमच्या शिवसेनेतील काही नेत्यांना वाड्यावरची लाचारीच पत्करायची म्हटल्यावर त्याला इलाज नाही.
जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यात शिवसेना पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे. जर आमच्या नेत्यांनी तिकीट वाटपावेळी सन्मानजनक वाटाघाटी केल्या असत्या तर ही वेळच आली नसती. धाराशिव हा शिवसेना धनुष्य बाणाचाच गढ आहे हे दाखवू न देता आले असते. पण असो….
शिवसेना पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी सर्वच नात्यांमध्ये संवाद निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले. पालकमंत्री साहेब, सावंत साहेब, रवी सर सर्वांच्या सोबत काम केले. आम्हा शिवसैनिकांना सत्ता स्वाभिमानाने पाहिजे. लाचारी पत्करून नाही. असं देखील शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी म्हणलं आहे











