• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात धाराशिवमध्ये मविआ च्या बॅनरवरून तणाव शिवसेना (उबाठा) पक्षाची नाराजी

MH25News by MH25News
November 8, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात धाराशिवमध्ये मविआ च्या बॅनरवरून तणाव शिवसेना (उबाठा) पक्षाची नाराजी
0
SHARES
89
VIEWS

धाराशिव – धाराशिव शहरातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांच्या प्रचाराचे बॅनर लावण्यात आले होते. शहरातील मुख्य रस्त्यावर, ज्ञानेश्वर मंदिर ते छत्रपती शिवाजी  महाराज चौक या भागातील स्ट्रीट लाईट पोलवर अंदाजे ४० ते ५० बॅनर लावले गेले होते. हे बॅनर लावण्यासाठी नगर पालिका आणि महावितरण विभागाकडून रीतसर परवानगी देखील घेण्यात आली होती.
        मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या धाराशिव दौऱ्यानिमित्त नगर पालिकेने हे बॅनर हटवले, ज्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते संतप्त झाले. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना जाब विचारला आणि बॅनर का हटवण्यात आले, याची स्पष्टता मागितली. मुख्याधिकारी फड यांनी त्यावेळी  नजरचुकीने परवानगी देण्यात आल्याचे  सांगितले, मात्र गुरव यांनी या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केले नाही.
       गुरव यांचे आरोप होते की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्त महायुतीतील स्थानिक नेत्यांच्या दबावामुळेच हे बॅनर हटवण्यात आले. त्यांनी हा निर्णय राजकीय दबावामुळे घेतला असल्याचे सांगत नगर पालिकेवर गंभीर आरोप केले. त्यांनी यासंदर्भात विधान केले की, “लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिवमध्ये येऊनही, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयी झाले होते. आता मुख्यमंत्री येवो, पंतप्रधान येवो, कुणीही येवो, यावेळीही महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील दणदणीत मतांनी विजयी होणार”
        विशेष म्हणजे, सोमनाथ गुरव यांनी नगर पालिकेने हटवलेले बॅनर पुन्हा लावले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे सभा संपवून हेलिपॅडकडे जात होते, आणि त्यांनी हे बॅनर पाहिले. यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते अधिकच ठाम झाले असून, त्यांच्या मते हे बॅनर हटवण्यामागे राजकीय षड्यंत्र होते.
        या घटनेमुळे धाराशिव शहरात निवडणुकीच्या वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते या घटनेवरून नाराज आहेत आणि त्यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!