• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, April 25, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या📰 जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान📰 पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र📰 ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक📰 अन विकासाचं पात फिरलं…
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

MH25News by MH25News
April 25, 2026
in क्राइम, ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, संपादकीय
0
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
0
SHARES
62
VIEWS

धाराशिव – शिराढोण येथील एका दुकानातून शेकडो किलो कॉपर वायरची (तांब्याची तार) चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने वाशी फाटा परिसरातून गुरुवारी (ता. २३) गजाआड केले.या कारवाईत आरोपीकडून १७ किलो कापर वायर आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो जीप असा एकूण ३ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धनाजी बाबुराव पवार (रा. आळणी फाटा, रेल्वे स्टेशनजवळ, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार शिवाजी सर्जेराव काळे (रा. अंदोरा, सध्या मु. कन्हेरवाडी पाटी, ता. कळंब) याचा पोलीस शोध घेत आहेत.

Follow us on social media:

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि त्यांचे पथक मालमत्तेविषयक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी गस्तीवर होते. यादरम्यान, शिराढोण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कापर वायर चोरीतील (गु.र.नं. १३/२०२६) आरोपी धनाजी पवार हा चोरीचा माल विकण्यासाठी वाशी फाटा येथे थांबल्याची खात्रीलायक माहिती एका गुप्त बातमीदारामार्फत पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशी फाटा परिसरात सापळा रचून धनाजी पवार याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार शिवाजी काळे याच्या मदतीने शिराढोण येथील एका दुकानातून २०० ते २५० किलो कापर वायर चोरल्याची कबुली दिली. ही चोरी करण्यासाठी त्यांनी “एमएच १४ सीएक्स २३७७ या क्रमांकाच्या टाटा सुमो जीपचा वापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १७ किलो कॉपर वायर व गुन्ह्यात वापरलेली जीप हस्तगत केली आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात, सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार सचिन खटके, अमोल चव्हाण, बळीराम शिंदे, अमोल निंबाळकर, राहुल नाईकवाडी, महिला पोलीस अंमलदार शोभा बांगर आणि चालक विनायक दहिहंडे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
अर्थव्यवस्था

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान

April 23, 2026
पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र
अर्थव्यवस्था

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र

April 20, 2026
३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक
क्राइम

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक

April 16, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

अन विकासाचं पात फिरलं…

April 11, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप

April 5, 2026
सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभे असताना धाराशिव बनत आहे उर्जास्थान
  • पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र
  • ३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक
  • अन विकासाचं पात फिरलं…
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!