• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, November 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

‘जेएन- 1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी

MH25News by MH25News
December 29, 2023
in अर्थव्यवस्था, आरोग्य, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
‘जेएन- 1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी
0
SHARES
0
VIEWS

आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत नागरिकांना आवाहन

मुंबई – राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आली असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी साथी आणि संसर्गजन्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक आज पार पडली. आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्यांचे सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच टास्क फोर्सचे सदस्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदार, नवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदम, आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले.

Follow us on social media:

‘जेएन-1’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच याबाबत ‘मॉक ड्रील’ राहीलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रूग्णालयांमध्ये ती करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते योग्य उपचार करावेत. नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळी जातात. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतील, त्यामुळे हा विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सूचविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी यावेळी सांगितले की, जेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली, तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी. बी. कदम या टास्क फोर्सच्या सदस्यांनीही बैठकीत आपले मत व्यक्त केले.,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच टास्क फोर्सचे सदस्य नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदार, नवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदम, आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले.

संबंधित बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!