• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, September 4, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!📰 माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती📰 बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक📰 ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार📰 ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र

MH25News by MH25News
April 20, 2026
in अर्थव्यवस्था, क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधीचा गैरवापर केल्यामुळे शिराढोणचे सरपंच अपात्र
0
SHARES
82
VIEWS

धाराशिव – कळंब तालुक्‍यातील शिराढोण ग्रामपंचायतीतील सरपंचांविरुद्ध दाखल प्रकरणात विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी निर्णय देत सरपंचांना पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम 39(2) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात अर्जदार अमित कुमुदराव माकोडे यांनी सरपंच श्रीमती लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, १५ वा वित्त आयोग अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचे तसेच काम अपूर्ण असतानाही देयक अदा केल्याचे नमूद करण्यात आले होते.

सदर प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या स्तरावर करण्यात आली. चौकशी अहवालात पाणीपुरवठा योजनेतील काही कामे पूर्ण न होता देयके अदा केल्याचे आणि निधीच्या वापरात नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. यावरून सरपंचांनी कर्तव्यात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला. अर्जदाराच्या वतीने अँड. अमोल माकोडे यांनी बाजू मांडली, तर प्रतिवादी सरपंच श्रीमती म्हेत्रे यांच्या वतीने अँड. एच. पी. जाधव यांनी युक्तिवाद केला. विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर सरपंचांना पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.

Follow us on social media:

तसेच संबंधित शाखा अभियंता व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनियमिततेशी संबंधित रकमेची वसुली करून ती शासन तिजोरीत जमा करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिराढोण ग्रामपंचायत प्रशासनात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, स्थानिक पातळीवर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!
क्रीडा

आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!

September 4, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
ग्रामीण

माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती

August 30, 2026
बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
क्रीडा

बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक

August 28, 2026
‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026
ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
ग्रामीण

ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!

August 27, 2026
कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
महाराष्ट्र

कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट

August 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी ‘महाराष्ट्राची वाघीण’ अखेर हरली…!
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
  • बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
  • ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
  • ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!