• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, November 23, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी📰 धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची लॉटरी लागणार?📰 प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! आठ महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट📰 पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित📰 बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनला सेरेंटिकाचे पाठबळ
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची लॉटरी लागणार?

MH25News by MH25News
November 22, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची लॉटरी लागणार?
0
SHARES
417
VIEWS

ओमराजेंना पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता; तर तानाजी सावंत यांचे राज्य मंत्रिमंडळात पुनरागमन होणार? राजकीय वर्तुळासह समर्थकांमध्ये उत्सुकता

धाराशिव – राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्याला एकाच वेळी दोन मंत्रीपदे मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून, खासदार ओम राजेनिंबाळकर आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नावांची मंत्रिपदासाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पहिल्यांदाच केंद्रात राज्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान झालेल्या राजकीय भेटीगाठी आणि चर्चांमुळे ओमराजे यांच्या नावाबाबतच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेकडून केंद्रात मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे.

दुसरीकडे, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याच्या चर्चांनी त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, २८ किंवा २९ नोव्हेंबरदरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवस धाराशिवच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Follow us on social media:

दोन मंत्रीपदे मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाला बळ?

धाराशिव जिल्हा आजही सिंचन, पाणीप्रश्न, शेती, रोजगार, आरोग्य आणि औद्योगिक विकासाच्या अनेक समस्यांशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याला केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरांवर मंत्रिपदाचे प्रतिनिधित्व मिळाल्यास विकासकामांसाठी मोठे पाठबळ मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होऊ शकते.

मात्र, खासदार ओम राजेनिंबाळकर यांना केंद्रीय मंत्रिपद किंवा आमदार तानाजी सावंत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या या चर्चांकडे राजकीय शक्यता म्हणूनच पाहिले जात आहे.

एकीकडे केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा, तर दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली… अशा पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी
देश-विदेश

राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

November 22, 2026
प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! आठ महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट
क्राइम

प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! आठ महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट

November 20, 2026
पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित
अर्थव्यवस्था

पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित

November 19, 2026
बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनला सेरेंटिकाचे पाठबळ
अर्थव्यवस्था

बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनला सेरेंटिकाचे पाठबळ

November 18, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी
  • धाराशिव जिल्ह्याला दोन मंत्रीपदांची लॉटरी लागणार?
  • प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! आठ महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट
  • पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित
  • बालाघाट हिल हाफ मॅरेथॉनला सेरेंटिकाचे पाठबळ
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!