• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, February 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर📰 कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव📰 महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे प्रसादाचे वाटप📰 कळंब तालुक्यातील महाकाली कला केंद्रात तरुणाचा खून📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

MH25News by MH25News
February 26, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव
0
SHARES
25
VIEWS

धाराशिव – धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील जिजाऊ नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी कोरड्या विहिरीमध्ये चार लहान कुत्र्यांची पिल्ले पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. विहिरीत उतरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या नसल्यामुळे पिल्लांना बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. दोन दिवसांपासून पिल्ले विहिरीत अडकून पडल्याने त्यांना अन्न-पाण्याची तीव्र अडचण निर्माण झाली होती आणि त्यांचा मृत्यू होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती.

स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेतील प्रमुख लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. अखेर नागरिकांनी प्रभागाचे नेतृत्व करणारे नगरसेवक अभिजित पतंगे यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पतंगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थितीची पाहणी करून पिल्लांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. त्यांनी सचिन कदम यांच्याशी संपर्क साधला. दोरीच्या सहाय्याने सचिन कदम हे विहिरीत उतरले आणि बकेटच्या मदतीने एकामागून एक चारही पिल्लांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

Follow us on social media:

या धाडसी आणि तत्पर कार्यामुळे चार निष्पाप जीवांना अक्षरशः नवजीवन मिळाले. नगरसेवक अभिजित पतंगे यांच्या संवेदनशील आणि जबाबदार भूमिकेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यात उमेश चव्हाण, अजिंक्य शिंदे आणि सचिन कदम यांनीही मोलाचे सहकार्य केले. जिजाऊ नगरमधील नागरिकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत, “अडचणीच्या वेळी धावून येणारा लोकप्रतिनिधीच खरा” अशी भावना व्यक्त केली.

नगरसेवक अभिजित पतंगे यांच्या या कृतीमुळे लोकप्रतिनिधींनी केवळ विकासकामेच नव्हे तर सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

संबंधित बातम्या

भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर
अर्थव्यवस्था

भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर

February 26, 2026
महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे प्रसादाचे वाटप
ग्रामीण

महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे प्रसादाचे वाटप

February 16, 2026
कळंब तालुक्यातील महाकाली कला केंद्रात तरुणाचा खून
क्राइम

कळंब तालुक्यातील महाकाली कला केंद्रात तरुणाचा खून

February 15, 2026
धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर
  • कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव
  • महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे प्रसादाचे वाटप
  • कळंब तालुक्यातील महाकाली कला केंद्रात तरुणाचा खून
  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!