• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

MH25News by MH25News
February 2, 2026
in अर्थव्यवस्था, क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
0
SHARES
865
VIEWS

धाराशिव – वाशी तालुक्‍यातील तेरखेडा गावाजवळ असलेल्या खामकरवाडी परिसरातील डिझायर फायर वर्क्स या फटाका निर्मिती कारखान्यात शनिवारी संध्याकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेदरम्यान भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून तेरखेडा येथे आठवडी बाजार असल्याने कारखान्याला सुट्टी होती. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र कारखानदाराचे लाखो रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.

वाशी तालुक्‍यातील तेरखेडा हे गाव फटाका उद्योगासाठी प्रसिद्ध असून मराठवाड्याची शिवकाशी’ म्हणून देखील ओळखले जाते. या परिसरात फटाके निर्मितीचे जवळपास 40 ते 50 कारखाने असून अनेक कुटुंबांची उपजीविका या उद्योगावर अवलंबून आहे.

तेरखेडा गावालगत असलेल्या खामकरवाडी शिवारात तेरखेडा येथील अहमद शेख, बिलाल शेख यांच्या मालकीचा ‘डिझायर फायरवर्क्स’ हा फटाका कारखाना आहे. शनिवारी संध्याकाळी सुमारे पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कारखान्यातील एका खोलीत अचानक दोन जोरदार स्फोट झाले. या स्फोटानंतर आगीने तात्काळ उग्र रूप धारण केले. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत तेरखेडा, बावी, सटवाईवाडी, खामकरवाडी, रत्नापूर,पानगाव पर्यंत दोन स्फोटाचे आवाज ऐकू गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Follow us on social media:

कारखान्यात फटाके तयार करण्यासाठी साठवण्यात आलेला कच्चा माल, रसायने व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे. आगीमुळे कारखान्याचे संपूर्ण शेड व यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आज बाजाराची सुट्टी असल्याने कारखान्यात एकही कामगार उपस्थित नव्हता यामुळे जिवीत हानी टळली,. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिकांनी स्वतः प्रयत्न केल्याचे समजते. या कारखान्यात जवळपास 40 ते 50 कामगार काम करतात. रात्री उशिरापर्यंत देखील या कारखान्यात काम सुरू असते अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाय योजना नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास उशीर झाल्याने मोठे नुकसान झाले असून पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टिकोनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कारखान्यात स्फो नेमका कशामुळे झाला आहे अद्याप देखील समजले नसून पुढील अधिक तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!