वाशी – तेरखेडा जिल्हा परिषद गटातून संदेश उर्फ विकी चव्हाण यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचाराचा आज भव्य शुभारंभ करण्यात आला. भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विकी चव्हाण यांच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच जोरदार पाठिंबा मिळताना दिसत आहे.
शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी विकी चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली असून, या निर्णयाचे तेरखेडा परिसरात स्वागत होत आहे. युवकांचे प्रश्न, स्थानिक विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विकी चव्हाण हे कटिबद्ध राहतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. सत्यवान गपाट, संघटक शिवार स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, नागजी नाईकवाडी, शरद मनगिरे यांच्यासह तेरखेडा गावातील युवक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विकी चव्हाण यांना शुभेच्छा देत प्रचाराला गती देण्याचे आवाहन केले.
या प्रचाराच्या शुभारंभाने तेरखेडा जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापले असून, येत्या काळात ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.











