• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव मध्ये भाजपकडून “निष्ठावंतांना” डावलत “आयारामांना” संधी

MH25News by MH25News
January 24, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव मध्ये भाजपकडून “निष्ठावंतांना” डावलत “आयारामांना” संधी
0
SHARES
966
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. निष्ठावंतांना डावलून आयरामांना “लाल गालीचा” अंथरल्याने निष्ठावंतांनी एल्गार पुकारत अपक्ष लढवण्याची तयारी केली असल्याचे चित्र धाराशिव जिल्ह्यात पहायला मिळत आहे.

धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील माजी सरपंच व भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा माधुरी गरड यांना डावलून, अंबेजवळगा गटातून ठाकरे गटातून भाजपमध्ये आयात केलेले शाम जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माधुरी गरड या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या विचारधारेसाठी काम करत असून, ग्रामपंचायतपासून ते तालुका पातळीवर त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने योगदान दिले आहे. असे असताना, त्यांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवाराला थेट जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत संधी दिल्याने “निष्ठेपेक्षा आयातीला प्राधान्य” दिले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

या निर्णयामुळे अंबेजवळगा गटासह परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, काहींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. “पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली जात असेल, तर कार्यकर्त्यांनी का काम करावे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, भाजप नेहमीच निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत असल्याचा दावा करत आला आहे. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी वाटपात वेगळेच चित्र दिसत असल्याने पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Follow us on social media:

या उमेदवारीमुळे भाजपच्या मतांवर परिणाम होणार का, तसेच माधुरी गरड व इतर नाराज मंडळी तसेच नाराज कार्यकर्ते कोणती भूमिका घेणार, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उभा राहिलेला हा अंतर्गत वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!