• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राहुल मोटेंना मोठा धक्का; विश्वासू शिलेदाराने सोडली साथ

MH25News by MH25News
January 20, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राहुल मोटेंना मोठा धक्का; विश्वासू शिलेदाराने सोडली साथ
0
SHARES
6.8k
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होत असतानाच तेरखेडा जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. माजी आमदार राहुल मोटे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे बालाजी घोलप यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत मोटे यांची साथ सोडली आहे. या घडामोडीमुळे तेरखेडा परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बालाजी घोलप यांनी शिवसेना नेते राजन साळवी आणि माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षात अधिकृत प्रवेश केला. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घोलप यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित नेत्यांनी घोलप यांच्या प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तेरखेडा गटातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये घोलप यांचा थेट संपर्क असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय राहुल मोटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक पातळीवर मोटे समर्थकांमध्येही यामुळे अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे.

Follow us on social media:

बालाजी घोलप हे केवळ राजकीय कार्यकर्ते नसून युवा नेतृत्व आणि उद्योजक म्हणूनही ओळखले जातात. तेरखेडा परिसरातील तरुण वर्गामध्ये त्यांची चांगली पकड आहे. विविध सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा आणि युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचा शिवसेना प्रवेश पक्षासाठीही फायद्याचा ठरू शकतो, असे बोलले जात आहे.

दरम्यान, या प्रवेशामुळे तेरखेडा जिल्हा परिषद गटातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राहुल मोटे यांना आपली राजकीय रणनीती नव्याने आखावी लागणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी काळात आणखी काही स्थानिक नेते पक्षबदल करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय घडामोडीने तेरखेडा परिसरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रवेशावेळी भैरवनाथ शुगर चे चेअरमन केशव सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव साळवे, तेरखेडा गावचे उपसरपंच फरीद पठाण, विकी चव्हाण, अच्युत शिंदे, सोहम सरवदे, अक्षय चव्हाण, नितीन घुले, संदीप देशमुख, दिनेश मुळे तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!