• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, November 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का; २ वेळा विधानसभा लढलेला उमेदवार काँग्रेसच्या गळाला

MH25News by MH25News
November 11, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का; २ वेळा विधानसभा लढलेला उमेदवार काँग्रेसच्या गळाला
0
SHARES
1k
VIEWS

धाराशिव – आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी धाराशिव जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. धाराशिव जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणचे चित्र पालटले आहे. भूम-परंडा मतदारसंघातील माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर व संजय निंबाळकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडली आहे. त्यानंतर आता नळदुर्ग येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकासह काँग्रेसचा हात धरल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली आहे. येत्या काळात तुळजापूरमध्ये भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील विरुद्ध अशोक जगदाळे अशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समोरासमोर येणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार व एक खासदार होता. मात्र, आता चित्र पूर्णपणे पालटले आहे. या सर्व प्रकाराला येथील स्थानिक नेतृत्व कारणीभूत असल्याचा दावा पक्ष सोडताना या सर्वच नेतेमंडळींनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात पक्ष काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन महिन्यापूर्वी माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर धारशिवाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व संजय निंबाळकर यांनी साथ सोडली आहे. त्यातच आता अशोक जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नळदुर्गमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला खिंडार

Follow us on social media:

अशोक जगदाळे यांच्यासोबत नळदुर्ग नागरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक अमृत पुदाले, माजी नगरसेवक शरीफ शेख, माजी नगरसेविका सुमन जाधव, विकास सोसायटी चेअरमन संजय बेडगे,
व्हाइस चेअरमन ताजोद्दीन सय्यद, रुकनोद्दीन शेख, नवल जाधव, अमोल सुरवसे, ताजोद्दीन सावकार, अलीम शेख, दत्ता राठोड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडले आहे. नगरपालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत जगदाळे यांची नळदुर्ग नगरपालिकेवर सत्ता होती. त्यांनी नगराध्यक्षासह १२ नगरसेवक निवडून आणले होते. मात्र, त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने शरद पवार यांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहेत अशोक जगदाळे?

अशोक जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. २०१८ साली त्यांनी उस्मानाबाद-बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था (विधानपरिषद ) निवडणूक ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने रिंगणातून माघार घेतल्यानंतर मोठया हिंमतीने लढली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात दंड थोपटला होता. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या जगदाळे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. अटातटीच्या या निवडणुकीत त्यांचा केवळ ३२ मताने पराभव झाला होता. जवळच्या मंडळींनी दगाफटका केल्याने त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यानंतर त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक तुळजापूरमधून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यावेळेस त्यांना जवळपास 37 हजार मते पडली होती. त्यांच्यासोबत काँग्रेसचे विद्यमान आमदार मधूकरराव चव्हाण हे पण पराभूत झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राणाजगजितसिंह पाटील यांना 99 हजार 034 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे मधुकरराव चव्हाण यांना दुसऱ्या क्रमांकाची 77 हजार इतकी मते मिळाली. विजयाचे अंतर हे जवळपास 23 हजार169 इतके होते. तर वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांना या निवडणुकीत जवळपास 37 हजार मते मिळाली होती. त्यासोबतच त्यांनी तुळजापूर तालुक्यात विविध सामाजिक कार्य केली आहेत.

संबंधित बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!