शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते धनुष्यबाण सोडून मशाल हातामध्ये घेण्याच्या तयारीत
वाशी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष्यांचा हालचाली सुरू झाले आहेत. नुकताच निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात होणाऱ्या महानगरपालिका व नगरपालिका त्यांच्या होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून इच्छुकांनी देखील हालचाली सुरू केल्या असून जमवाजनवीचे समीकरणे देखील जुळवू लागली आहेत. इच्छुकांनी आपल्या सोयीनुसार राजकीय समीकरणे जुळवून आणण्यासाठी चाचण देखील सुरू केली आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातून शिंदे सेनेला मोठे खिंडार पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या सेनेला खिंडार पडण्याची शक्यता असून यामध्ये अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे ठाकरेंच्या सेनेमध्ये दाखल होणार असल्याचे MH25News च्या खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे.
इच्छुकांनी कार्यकर्त्यांसह पक्षांच्या नेतेमंडळींच्या गाठीभेटीवर जोर दिला असून आपल्या गळ्यात तिकीट पाडून घेण्यासाठी शक्ती प्रदर्शन करताना देखील दिसून येत आहेत. तर राजकीय पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी देखील एकमेकांना भेटून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षांतर्गत असणाऱ्या वादातून तसेच कुरघोडीतून काही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाशी तालुक्यातील शिंदेंच्या सेनेतील काही नेते व कार्यकर्ते यांनी ठाकरे गटामध्ये दाखल होण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे येत्या काही दिवसातच वाशी तालुक्यात शिंदे सेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











