• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवच्या राजकारणात ‘नेम प्लेट’ची ‘गेम’

MH25News by MH25News
June 2, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिवच्या राजकारणात ‘नेम प्लेट’ची ‘गेम’
0
SHARES
788
VIEWS

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासमोर ‘राज्यमंत्री’ पदाची नेमप्लेट आणि धाराशिवचं राजकारण हसून बेशुद्ध!

धाराशिव – राजकारणात ‘नेम’कं काय होईल, याचा काही ‘नेम’ नाही, पण काही वेळा ‘नेमप्लेट’ काय सांगून जाईल याचाही ‘नेम’नसतो! अशीच एक ‘हटके’ स्क्रिप्ट सध्या धाराशिवच्या राजकारणात रंगली आहे.

आता बघा ना… तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील – दोन वेळा आमदार, एकदा “भावी मंत्री”, दुसऱ्यांदा “पक्के मंत्री” व्हायचं राहून गेलं. आणि आता ते थेट ‘राज्यमंत्री’च! काय..विश्वास बसत नाही? बसणारच नाही, कारण हे पद त्यांना मिळालंच नाहीये… मिळालीये ती फक्त नेमप्लेट!

‘भावी पालकमंत्री’ ते ‘मी मित्रा’चा उपाध्यक्ष!

साहेबांचे समर्थक सोशल मीडियावर एकेकाळी “भावी पालकमंत्री” म्हणून डंका वाजवत होते. पण मंत्रिमंडळात प्रवेश न झाल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते कोपऱ्यात गेले होते. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शाब्बास बच्चा!’ म्हणत त्यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या सल्लागार संस्थेचे उपाध्यक्षपद बहाल केलं.

आणि मग काय? साहेबांचा थाट एकदम पालकमंत्री टाईप! जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बैठक, अधिकाऱ्यांना सूचना, जिल्हा नियोजनच्या चर्चांमध्ये फाईल वाचणे वगैरे सुरू झालं. हे पाहून कार्यकर्त्यांच्या उरात फुलं फुलायला लागली — “दादा आता मंत्रीच झाले!”

‘राज्यमंत्री’ नेमप्लेटचा थरार

मग आला १ मे – नेमप्लेटच चर्चेचा विषय बनली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठक खोलीत आमदार राणा पाटील यांच्या समोर ठेवलेली ‘राज्यमंत्री’ लिहिलेली नेमप्लेट म्हणजे ‘स्माईल विथ स्टाईल’चा झंझावात होता. साहेबांचं हसू थांबत नव्हतं, कार्यकर्ते तर अक्षरशः ‘मोदी कॅबिनेटमध्ये झेंडा रोवला’ अशा अविर्भावात सेल्फी घेत होते.

Follow us on social media:

माहितीच्या अधिकाराने फोडला ‘फुगा’

कथा इथेच थांबली असती, तर ती छान रंगली असती. पण अचानक एका शहाण्या RTI कार्यकर्त्याने ‘मित्रा उपाध्यक्ष’ पदाचा दर्जा काय, हे विचारून अख्खं प्रकरण पिंजारून टाकलं.

सरकारी दस्ताऐवज सांगतात – ‘मित्रा उपाध्यक्ष’ हे सल्लागार पद आहे, राज्यमंत्री दर्जा नाही!

बस्स… आणि इकडे ‘राज्यमंत्री’ पाटी पाहून जे हसले होते, त्याच लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

मग नेमप्लेट कुणी लावली?

हा तर थेट ‘पॉलीटिकल CID’चा विषय!

  • ही पाटी कुणी छापली?
  • कुणी ठेवली?
  • साहेबांना माहिती होती की नाही?
  • की खुद्द त्यांनीच ‘नावापुढं मंत्रीपद’ चढवलं?

यावर प्रशासन मौनव्रती झालं आहे आणि लोकं चर्चाव्रती.

हा केवळ ‘नेमप्लेट’ गेम आहे की ‘नेमलेलं प्लॅनिंग’…? कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे की सत्तेचा मोह? उत्तर येईलच, पण तोवर ‘राज्यमंत्री पाटी’ धाराशिवच्या राजकारणात एकदम ‘चाय पे चर्चा’ चा विषय बनली आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!