• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, November 17, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

ठेचून मारलं; मृतदेहाजवळ दोन दिवस झोपला

MH25News by MH25News
April 1, 2025
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
ठेचून मारलं; मृतदेहाजवळ दोन दिवस झोपला
0
SHARES
449
VIEWS

कळंब – कळंब मधील द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हिचे मारेकरी अखेर पोलीसांना सापडले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या आरोपींना पकडण्यात यश आले आहे. रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या 2 आरोपींना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. उस्मान सय्यद याला संशयित म्हणून 3 दिवसांपूर्वी पोलिसांनी केज येथून ताब्यात घेतले होते. तर मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ रामा भोसले ज्याने प्रत्यक्षात खून केला तो पोलिसांना गुंगारा देत होता. आळंदी, पुणे, मिरज, गोवा, कर्नाटक या ठिकाणी तो फरार फिरत होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपीनिय माहिती मिळाली की तो येरमाळा येथे आलेला आहे. सापळा रचून पोलीसांनी मंगळवारी सकाळी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मनीषा बिडवे-कारभारी ही 45 वर्षांची महिला द्वारका नगरी वसाहतीत राहत होती. 27 तारखेला तिच्या राहत्या घरात तिचा सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मृत महिला ही संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेली महिला असून तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शंका उपस्थित केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले होते. मात्र पोलिसांनी या महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी सबंध नसल्याचं सांगून टाकलं. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी मिळालेले पुरावे, फोन कॉल्स याच्या माध्यमाने पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला अखेर पोलिसांना दोन्ही आरोपी अटक करण्यात यश आले आहे.

Follow us on social media:

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मनीषा बिडवे हिच्याकडे मागील काही महिन्यांपासून रामेश्वर भोसले नावाचा तरुण काम करत होता. तो सुरुवातीला तिचा ड्राइव्हर होता. नंतर संबंधित महिलेसोबत त्याचे सबंध जुळले. नंतर-नंतर ती त्याला त्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून टॉर्चर करू लागली. गुन्हा दाखल करायची धमकी देऊन त्याचा छळ करायला लागली. दररोज आरोपी रामेश्वरला मारहाण करून शारीरिक छळ करत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून कळतेय.

घटनेच्या दिवशी म्हणजे 22 मार्च रोजी तिने त्याला 100 उठाबशा काढायला लावल्या होत्या. या सगळ्या त्रासातून त्याने तिच्या डोक्यात वार केला. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला, असं देखील पोलीस सूत्रांकडून कळतंय. इतकंच नाही तर संबंधित आरोपी 2 दिवस मृतदेह असलेल्या घरात राहिला, जेवण ही तिथेच करायचा. तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने ती तिथून तिची गाडी घेऊन बाहेर पडला. यादरम्यान त्याने त्याचा केजचा असलेला मित्र उस्मान सय्यद याला द्वारका नगरीत आणून मृत बॉडी दाखवली. दोघेही सुरुवातीला पुरावे नष्ट करायला आल्याचं, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सुरुवातीला एलसीबी पोलीसांनी उस्मानला ताब्यात घेतलं, त्यानंतर तपासाचा धागा पकडत मुख्य आरोपी रामेश्वर भोसले याला देखील आज अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे , फरहानखान पठाण, जावेद काझी या पोलीस पथकाने आरोपींना पकडण्यात यश मिळवले.

संबंधित बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!